PMC Fog Canon Machine | हवा प्रदूषण कमी करण्यासाठी फॉग कॅनॉन मशीनचा वापर | पुणे महानारपालिकेमार्फत ५ फॉग कॅनन मशीनची खरेदी 

Homeadministrative

PMC Fog Canon Machine | हवा प्रदूषण कमी करण्यासाठी फॉग कॅनॉन मशीनचा वापर | पुणे महानारपालिकेमार्फत ५ फॉग कॅनन मशीनची खरेदी 

Ganesh Kumar Mule Apr 03, 2025 6:47 PM

7th Pay Commission DA Update | 7वा वेतन आयोग DA अपडेट: 38% महागाई भत्ता – जाहीर!  | केंद्रीय कर्मचाऱ्यांना डीए थकबाकीही भेट
PMC Devlopment Work Bill | बिले सादर करण्याबाबत पुन्हा ठरवावी लागली नियमावली | काम सुरु केल्याच्या दिनांकापासून प्रत्येक तिमाहीच्या अखेरीस बिले सादर करण्याचे आदेश 
Kasba Peth by-election | कसबा पेठ पोटनिवडणुक | कॉंग्रेसच्या १६ इच्छुकांनी दिल्या मुलाखती

PMC Fog Canon Machine | हवा प्रदूषण कमी करण्यासाठी फॉग कॅनॉन मशीनचा वापर | पुणे महानारपालिकेमार्फत ५ फॉग कॅनन मशीनची खरेदी

 

PMC Environment Department – (The Karbhari News Service)- केंद्र सरकारच्या नॅशनल क्लीन एअर प्रोगाम (NCAP) मधील 15 व्या वित्तीय आयोग अंतर्गत भारतातील १३० शहरातील हवा प्रदूषण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. हवा प्रदूषणामध्ये PM 10 (१० मायक्रॉन पेक्षा कमी आकार असलेले धुलीकण)  व PM 2.5 (२.५ मायक्रॉन पेक्षा कमी आकार असलेले धुलीकण ) अशा धुलीकणांचे प्रमाण कमी करण्यासाठी उपाययोजना म्हणून NCAP मध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणेसाठी पुणे महानारपालिकेमार्फत (Pune Municipal Corporation – PMC) ५ परिमंडळसाठी प्रत्येकी १ असे एकूण ५ फॉग कॅनन मशीन (Fog Cannon Machine) खरेदी करण्यात आले आहेत. (Pune PMC News)

फॉग कॅनॉन मशीन: फॉग कॅनॉन मशीनसाठी एका CNG इंधन वापरणाऱ्या  ट्रकच्या चासीवर ६००० लिटरची स्टीलची टाकी बसविण्यात आली आहे. ट्रकच्या मागील बाजूस २२ नोझल असलेले ३ KW चा high pressure pump पॉवर असलेले फॉग कॅनॉन मशीन बसविण्यात आले आहे. या मशीनमध्ये २२ पाण्याचे नोझल बसविणात आले असून  त्यामधून १० kg /sq cm एवढ्या प्रेशरने ५० मायक्रॉन पर्यंतचे पाण्याचे अतिसूक्ष्म कण बाहेर फेकले जातात.  यामुळे  हवेतील धुलीकणांचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. अशा प्रकारच्या मशीन्स दिल्ली, चंडीगड, मीराभायंदर, पिंपरी-चिंचवड व इतर शहरांमध्ये वापरण्यात येत आहे.

रस्त्यांवरील धुळीचे प्रमाणकमी करणेच्या दृष्टीने Fog Cannon मशीनचा वापर करण्यात येणार असून शहरातील खालील प्रमुख रस्त्यांवर याचा वापर करण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त शारामध्ये इतर आवश्यक ठिकाणी देखील या मशीनचा वापर करण्यात येणार आहे.

शिवाजीनगर ते बाणेर
कर्वे रस्ता (पुणे मनपा भवन ते वारजे)
सातारा रोड (स्वारगेट – कात्रज- कोंढवा)
सोलापूर रोड (स्वारगेट- शेवाळेवाडी)
संगवाडी- येरवडा –केसनंद फाटा
सिंहगड रोड (दांडेकर पूल-धायरी फाटा)

Fog cannon machine mounted vehicle चे प्रत्याक्षिक महानगरपालिकेच्या आवारात पृथ्वीराज बी. पी., अति. महापालिका आयुक्त (इ) व महानगरपालिकेच्या इतर अधिकारी यांना दाखविण्यात आले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: