PMC Environment Report 2024 | पर्यावरण अहवाल २०२४ ला महापालिकेच्या मुख्य सभेची मंजुरी | जाणून घ्या अहवालातील ठळक गोष्टी
PMC Environment Department – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेच्या पर्यावरण विभागाने यंदाचा पर्यावरण अहवाल तयार केला आहे. या अहवालाला मुख्य सभेने मंजुरी दिली आहे. यातील प्रमुख बाबी जाणून घेऊया. (PMC Environment Report)
१. पुणे शहरात जूलै २०२४ पर्यंत एकूण ३८,६३,८४९ नोंदणीकृत वाहने झाली आहेत. सन २०२३ मध्ये २,९३,४७१ नवीन वाहनांची भर, तर सन २०२२ मध्ये नवीन २,५४,९०७ वाहनांची भर. यामध्ये इलेक्ट्रिक वाहनांची संख्या १८०७३ आहे. तसेच BS6 वाहनांची नोंदणी ८.८० लक्ष आहे.
२. PMPML च्या एकूण १८८७ बसेस कायर्रत असून त्यांपैकी ११८७ सी. एन. जी. व ४७३ इलेिक्ट्रक बस मिळून स्वच्छ इंधन वर चालणाऱ्या एकूण १८७९ बसेस आहेत. स्वच्छ इंधन वर चालणाऱ्या एकूण बस ताफ्याच्या ८८% आहे. इलेिक्ट्रक व सी.एन.जी. बसेसमुळे पुणे शहरातील वायू प्रदूषणाबरोबरच ध्वनी प्रदूषणाची पातळी देखील कमी होत आहे.PMPML च्या ४७३ इलेक्ट्रिक बस मार्च २०२४ पर्यंत एकूण प्रवास ४.०० कोटी कि.मी. पेक्षा जास्त झाला आहे व यामुळे अंदाजे ७००० टन कार्बन उत्सर्जन कमी होण्यास मदत झाली आहे.
३. हवा प्रदूषण मधील PM १० व PM २.५ या घटकांचे सन २०२३ मध्ये पी.एम.१० चे सरासरी प्रमाण शिवाजीनगर या ठिकाणी सर्वात जास्त नोंदविले गेले. वर्षभरातील ३६५ दिवसांपैकी एअर क्वालिटी इंडेक्स AQI हे PM 10 च्या बाबतीत १ दिवस POOR, ० दिवस VERY POOR आणि PM 2.5 च्या बाबतीत 30 दिवस POOR, 1 दिवस VERY POOR होते.
.
४. पुणे शहर व परिसरात आढळणाऱ्या विविध पक्ष्यांच्साठी हॉटस्पॉट ठरलेल्या नैसर्गिक अधिवासांचे ई- बर्ड या वेबसाईटवरील मॅपींग वरून पुणे शहराच्या पूर्व भागातील कवडीपाठ या ठिकाणी सर्वाधिक २६३ प्रजाती, तर ARAI टेकडीवर २५३, पाषाण तलाव परिसरात २३६ प्रजातींचे पक्षी आढळून आले आहेत.
५. शहरात प्रतिदिन तयार होणारा घनकचरा : २१०० ते २२०० मे.टन. ओला कचरा ९५० मे. टन:: यावर कंपोिस्टंग, बायोगॅस, बल्क वेस्ट जनरेटर, होम कम्पोिस्टंग, शेतकऱ्यामार्फत जिरवला जाणारा कचरा. ओल्या कचऱ्यापासून कॉम्प्रेस्ड बायोगॅसमधून (सीबीजी) वापर वाहनांसाठी साठी इंधन स्वरुपात वापरण्यास सुरुवात.
सुका कचरा १२०० मे. टन : सुका कचऱ्यावर RDF रीफ्युस डीराईव्ह्ड फ़ुएल, MRF- मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटी, कचरा वेचकां माफर्त रिसायकल, सिमेंट कंपनीस थेट वापर.
पुणे शहरातील विविध ठिकाणी कायर्रत कचरा प्रक्रिया प्रकल्पांमध्ये १००% कचऱ्यावर प्रक्रिया केली जात आहे. उरुळी फुरसुंगी कचरा डेपो येथे बफर झोन अमृत वन अंतर्गत ३०,००० वृक्षांची लागवड केली आहे.
६ . सन २०२३ मध्ये स्मशानभूमी मध्ये सरासरी ३६% विद्युत दाहिनी , २०% गॅस दाहिनी व ४४% लाकूड चा वापर करण्यात आला. ५६% नागरिकांची पर्यावरण पूरक विद्युत व गॅस दाहिनी वापरण्याकडे कल.
७. पुणे शहराची उर्जेची मागणी सर्वात जास्त रहिवासी भागात ४६,७४,३४८ kW होती , तर त्या खालोखाल खालोखालव्या व्यावसायिक व औद्योगिक भागांत आहे. मागील ५ वर्षांमध्ये ऊर्जेची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली असून सन २०१८-१९ मध्ये एकूण ६०,२५,५०८ kW पासून सन २०२२-२३ मध्ये ७७,११,५३२ kW झाला आहे, म्हणजेच सदर वाढ हि २७.९८% आहे.
८. पुणे शहराची वाटचाल कार्बन न्यूट्रॅलिटीच्या दिशेने व्हावी यासाठी कार्बन उत्सर्जन, ग्रीन हाउस गॅस व वातावरण बदल या विषयावर काम करण्यासाठी व पुणे शहर कार्बन न्युट्रल करण्याच्या दृष्टीने शहराचा क्लायमेट अँक्शन प्लॅन तयार करण्यात येणार आहे. मागील पाच वर्षांत सौर ऊर्जेच्य वापरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून सन २०१८-१९ मध्ये सौरऊर्जेचा सॅक्शन लोड २४,६१४ kW होता व सन २०२२-२३ मध्ये वाढून ७९,६१८ kW आहे. मागील पाच वर्षांत मोठी वाढ दिसून येत आहे.
९. पुणे शहरामध्ये सन २०२३ मध्ये एकूण ५६३.७० मी.मी. पावसाची नोंद झाली. सर्वाधिक तापमान ४१.० डिग्री सेल्सियस तर सर्वात कमी तापमान ७.४ डिग्री सेल्सियस होते.
१०. आय. जी. बी. सी. ग्रीन सिटी रेटिंग सिस्टीम अंतर्गत पुणे शहराला प्लॅटीनम रेटिंग प्राप्त झाले. शहराचा हरित विकास, ग्रीन बिल्डिंग, घनकचरा व्यवस्थापन, पाण्याची उपलब्धता , पब्लिक ट्रान्सपोर्ट मध्ये इलेक्ट्रिक बस चा वापर इ. पर्यावरण संवर्धन संबंधी केलेल्या कामासाठी प्लॅटीनम रेटिंग असलेले महाराष्ट्रातील प्रथम व भारतातील दुसरे शहर झाले आहे.
११ . माझी वसुंधरा अभियान ३.० मध्ये पुणे शहराला तृतीय क्रमांक प्राप्त झाला.
१२. पर्यावरण जागृतीसाठी वर्षभर विविध उपक्रम. प्लास्टिक बॉटल्स संकलन स्पर्धा २०२३, पुणे प्लॉगेथॉन २०२३ मेगा ड्राइव्ह’, ०३ जून २०२३ जागतिक सायकल दिन, पर्यावरण साप्ताह, क्लीन एअर फॉर ब्लू स्काईज, वन्यजीव सप्ताह इ.