PMC Engineer Promotion | पुणे महापालिकेच्या उप अभियंता पदोन्नती प्रक्रियेत आरोग्य मंत्र्यांचा हस्तक्षेप!
Prakash Abitkar – (The Karbhari News Service) – राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar) हे पुणे महापालिकेच्या (Pune Municipal corporation – PMC) उप अभियंता पदोन्नती (PMC Engineer Promotion) प्रक्रियेत हस्तक्षेप करत आहेत. शिवाय त्यांनी पदोन्नती यादी थांबवली आहे. असा आरोप माजी नगरसेवक उज्वल केसकर, प्रशांत बधे आणि सुहास कुलकर्णी यांनी केला आहे. (Pune PMC News)
माजी नगरसेवकांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदना नुसार पुणे महानगरपालिकेच्या सब इंजिनीयर यांच्या बढतीची यादी आरोग्य मंत्री यांनी आपल्या जिल्ह्यातील एका भ्रष्ट अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून थांबवल्याचे मनपा प्रशासनाच्या कडून कळले. मंत्री महोदय आपण चांगले काम करीत आहात. मात्र जो अधिकारी चुकीचे काम करतो त्याच्या सांगण्यावरून आपण यादी थांबवून अनेक इंजिनियर वर अन्याय करीत आहात. त्यामुळे तातडीने ज्या निस्पृह अधिकारी उपायुक्त यांना फोन करून यादी थांबवली, त्यांना फोन करून यादी पुढे पाठवा असा संदेश द्यावा. अशी मागणी केसकर, बधे आणि कुलकर्णी यांनी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे केली आहे.
COMMENTS