PMC Encroachment Department | बाबू गेनू चौक, मंडई चौक परिसरात अतिक्रमणांवर अतिक्रमण विभागाच्या वतीने कारवाई
Pune PMC News – (The Karbhari News Service) – कसबा – विश्रामबागवाडा क्षेत्रिय कार्यालय हद्दीतील बाबू गेनू चौक, मंडई चौक, MSEB केंद्र येथील सार्वजनिक रस्त्यावरील अतिक्रमणांवर अतिक्रमण विभागाच्यावतीने कारवाई करण्यात आली. (Pune Municipal Corporation – PMC)
या कारवाईत ३,२२९ चौरस फूट. अनधिकृत कच्चे/पक्के शेड / बांधकाम निष्कासित करण्यात आले. कारवाईत ) पथारी – २५, २) इतर – ४०, ३) शेड – २८ असा जप्त केलेला माल खडीमशीन स्मशान भूमी गोडाऊन व घोले रोड गोडाऊन येथे जमा करण्यात आले. ही कारवाई पुणे मनपा पोलीस कर्मचारी – ०३, एम.एस.एफ. जवान – ०५, जेसीबी – ०१, ट्रक – ०२, विगारी सेवक – १६ यांच्या मदतीने कारवाई करण्यात आली.
महापालिका आयुक्त यांचे आदेशानुसार उप आयुक्त संदीप खलाटे, मुख्य सुरक्षा अधिकारी तथा सहाय्यक अतिक्रमण/अनाधिकृत बांधकाम निर्मुलन विभाग प्रमुख डॉ. रमेश शेलार, व उप आयुक्त सुनिल बल्लाळ, प्रकाश बालगुडे महापालिका सहाय्यक आयुक्त कसबा-विश्रामबागवाडा क्षेत्रिय कार्यालय यांच्या नियंत्रणाखाली ही कारवाई करण्यात आली. यावेळी क्षेत्रिय अतिक्रमण निरीक्षक श्रीकृष्ण सोनार, अतिक्रमण निरीक्षक राजेश खुडे, सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक योगेश मतकर, गौरव बोंबले, श्रीमती सोनाली बोरगावकर इ. अतिक्रमण स्टाफ यंत्रणेसह कारवाईस उपस्थित होते.

COMMENTS