PMC Encroachment Action | नगर रोड, वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालय हद्द आणि गोयल गंगा रस्त्यावरील अतिक्रमणावर महापालिकेकडून जोरदार कारवाई
Pune PMC News – (The Karbhari News Service) – नगर रोड, वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालय हद्द आणि गोयल गंगा रस्त्यावरील अतिक्रमणावर महापालिका अतिक्रमण विभाग आणि बांधकाम विभागाच्या वतीने संयुक्तपणे जोरदार कारवाई करण्यात आली. अशी माहिती उपायुक्त संदीप खलाटे यांनी दिली. (Pune Municipal Corporation – PMC)
गोयल गंगा रस्त्यावरील वारंवार येणाऱ्या नागरिकांच्या तक्रारीमुळे व त्याना होणाऱ्या त्रासामुळे व वाहतूक कोंडीमुळे महापालिका आयुक्त यांनी वाढत्या अतिक्रमण निर्मूलन कारवाई आदेशानुसार आज रोजी अतिक्रमण निर्मूलन विभाग व बांधकाम विकास विभाग यांचे मार्फत संयुक्त कारवाई मध्ये गोयल गंगा रस्त्यावर रस्ता व पदपथावरील तसेच इमारतीच्या फ्रंट व साइड मार्जिन मधील अनधिकृत अतिक्रमणांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण निर्मूलन कारवाई करण्यात आली .
सदर कारवाईसाठी संदीप खलाटे उप आयुक्त अतिक्रमण निर्मूलन विभाग, राजेश खाडे उप अभियंता, संजय जाधव,श्रीकृष्ण सोनार क्षेत्रीय अतिक्रमण निरीक्षक, मयूर गेडाम कनिष्ठ अभियंता अविनाश धरपाळे अतिक्रमण निरीक्षक तसेच १४ सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक,पोलीस व महाराष्ट्र सुरक्षा बल व ५५ बिगारी सेवक इ सेवक व ६ ट्रक इ विभागाकडील स्टाफ हजर होता.
कारवाई मध्ये ६००० स्के.फूट कच्चे/पक्के शेड मोकळे केले.तसेच टेबल,खुर्च्या.टेंट,काऊंटर,तसेच पथारी साहित्य जवळपास सहा ट्रक साहित्य जप्त केले
सदरची कारवाई यापुढे देखील मोठ्या प्रमाणात चालूच राहणार आहे.

——
नगर रोड, वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील खराडी zensar आयटी पार्क परिसरातील व खराडी मुंढवा बायपास रोड वरील फ्रंट व साईड मार्जिन व सार्वजनिक रस्त्यावरील अतिक्रमणांवर महापालिका सहाय्यक आयुक्त श्री संजय पोळ यांच्या नियंत्रणाखाली बांधकाम विभाग व अतिक्रमण विभागाच्या वतीने संयुक्तरित्या कारवाई करण्यात आली.
कारवाईस बांधकाम विभाग निरीक्षक उमेश गोडगे, मंगेश गायकवाड उपस्थित होते त्याचप्रमाणे अतिक्रमण विभागाकडे संपूर्ण परिमंडळ क्रमांक एक कडील सर्व साहित्य निरीक्षक आपापल्या अतिक्रमण यंत्रणेसह कारवाईस उपस्थित होते. कारवाई दरम्यान व्यावसायिकांनी आपापल्या दुकानाच्या बाहेर मोठ्या प्रमाणावर छोट्या मोठ्या व्यवसायिकांना जागा लोखंडी लाकडी काउंटर लावून भाड्याने दिलेली आढळून आली. तसेच मोठ्या प्रमाणावर बाहेरील फ्रंट मार्जिनचा वापर मोकळी न ठेवता यावर टेबल खुर्ची लावून व्यावसायिक वापर चालू होता. यावर कारवाई करून पुढील प्रमाणे माल साहित्य खराडी गोडाऊन येथे जमा करण्यात आले.
१) लोखंडी स्टॉल काऊंटर ३४
२) हातगाडी-०८
३) गॅस सिलेंडर – 10
४) पथारी २
५) इतर ३४(खुर्च्या, टेबल, जाळ्या,)
कारवाईस पुणे महानगरपालिका पोलीस बंदोबस्त व एम एस एफ जवान यांच्या मदतीने कारवाई शांततेत पार पाडण्यात आली.

——

COMMENTS