PMC Encroachment Action | शिवाजी नगर परिसरात हाॅटेल वरील कारवाईचा पुन्हा दणका

HomeBreaking Newsपुणे

PMC Encroachment Action | शिवाजी नगर परिसरात हाॅटेल वरील कारवाईचा पुन्हा दणका

कारभारी वृत्तसेवा Nov 02, 2023 3:48 PM

Women’s Day | PMC | महिला दिनानिमित्त मनपा महिला कर्मचाऱ्यांना अर्ध्या दिवसाची सुट्टी
Dams Water | चार धरणातील पाणीसाठा  पोहोचला ५ टीएमसी वर | धरण क्षेत्रात संततधार सुरूच 
Girish Bapat Vs Shreenath Bhimale | श्रीनाथ भिमाले यांच्यावर कारवाई करा 

PMC Encroachment Action | शिवाजी नगर परिसरात हाॅटेल वरील कारवाईचा पुन्हा दणका

PMC Encroachment Action | आपटे रास्ता, घोले रस्ता, देशमुख पथ येथे जोरदार कारवाई करण्यात आली. या मध्ये हाॅटेल वर कारवाई करून फ्रंट मार्जिन, रेअर मार्जिन, साईड मार्जिन वर कारवाई करण्यात येवून सुमारे. 9000 चौ. फुट क्षेत्र मोकळं करण्यात आले. अशी माहिती उप अभियंता सुनिल कदम यांनी दिली.  (PMC Pune)

13 हॉटेल्स वर कारवाई करण्यात आली. या मध्ये होटल ग्रीन सिग्नल हॉटेल चा 5800 चौ. फुट चा समावेश आहे. या होटल वर यापुर्वी दोनदा कारवाई करण्यात आली आहे. कारवाई मध्ये बांबू, पत्रा , लोखंडी अँगल , ओनिग ई चे सहाय्याने बांधलेल्या शेड, ई. चा समावेश आहे.
कार्यकारी अभियंता श्री. बिपिन शिंदे, यांचे मार्गदर्शन खाली उप अभियंता श्री. सुनील कदम, शाखा अभियंता राहुल रसाळे, कनिष्ठ अभियंता समिर गढई यांनी, एक गॅस कटर घरपाडी विभागाकडील १० बिगारी, एक पोलिस गट ई च्या सहाय्याने कारवाई पूर्ण करण्यात आली.
या नंतर पुन्हा विनापरवाना शेड उभारल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा सुनिल कदम यांनी दिला आहे. (Pune Municipal Corporation)