PMC Employees Transfer | मिळकत कर, भवन रचना विभागातील बदल्यात आर्थिक देवाणघेवाण | कॉंग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांचा आंदोलनाचा इशारा
Arvind Shinde – (The Kabhari News Service) – कॉंग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी आरोप केला आहे कि, मिळकत कर, भवन रचना विभागातील बदल्यात आर्थिक देवाणघेवाण झाली आहे. महापालिका आयुक्त यांना लिहिलेल्या पत्रात शिंदे यांनी म्हटले आहे कि, पुणे मनपामध्ये ठराविक अधिकाऱ्यांची मक्तेदारी तयार झालेली असून ती आपल्या कार्यकाळात मोडेल अशी अपेक्षा आहे. प्रशासकीय बदल्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण होत असून हि खेदाची बाब आहे. (Pune Municipal Corporation – PMC)
शिंदे यांनी म्हटले आहे कि, बदली झालेल्या सेवकांना बदली खात्यात रुजू झालेबाबत आपले स्तरावरून अहवाल घेण्यात यावा. तसेच बदली झालेल्या सेवकांना पुन्हा आहे त्याचा खात्यात प्रत्यक्ष काम करणे बाबत मान्यता देऊ नये, अशा प्रकारचा प्रस्ताव सादर करणारे खातेप्रमुखांवर शिस्त भंगाची कारवाई प्रस्तावित करावी. याबाबत प्रशासनाने विसंगती निदर्शनास आणूनही कोणतेही पाऊल न उचलल्यास लोकशाही मार्गाने आयुक्त यांच्या दालनाबाहेर आंदोलन केले जाईल. असा इशारा देखील शिंदे यांनी दिला आहे. (PMC Property Tax Depatment)
शिंदे यांनी खालील मुद्य्यांबाबत संबंधित खातेप्रमुखांकडून सविस्तर खुलासा घेऊन आम्हास देण्यात यावा, अशी मागणी आयुक्तांना केली आहे.
भवन विभागाकडील अधिकारी र हे गेले ६ वर्षांपासून कागदोपत्री अन्य खात्यात प्रत्यक्षात भवन विभागात कार्यरत आहेत. ठराविक ठेकेदार यांच्या अर्थपूर्ण आशीर्वादाने त्यांनी अधीक्षक अभियंता पदाचा अतिरिक्त कार्यभार देखील मिळवला. यांच्या भ्रष्ट कामकाजाची पद्धती बाबत अनेक सभासदांनी तक्रारी केल्यावर बदली पात्र अधिकाऱ्यांच्या यादीत त्यांचे नाव समाविष्ट होऊन त्याची बदली होऊनही वरिष्ठ अधिकारी व ठराविक ठेकेदारांचा कंपू संबंधित अधिकारी याना पाणीपुरवठा व भवन रचना या दोन्ही ठिकाणी कामकाजास ठेवण्यासाठी प्रयत्नात आहेत.असा घातक पायंडा पडून देऊ नये.
सद्यस्थितीत लेखनिकी संवर्गातील सेवकांच्या बदल्या झालेल्या असून यामध्ये विशेषतः कर आकारणी विभागातील बदली झालेले सेवकांना “पुण्यातील एक माजी आमदार व त्यांचे सहकारी, तसेच वरिष्ठ कार्यालयातील अधिकारी” जरी तुमची बदली झाली तरी पुन्हा तुम्हाला टॅक्स विभागातच कामास ठेवायची फिल्डिंग लावतो असे सांगून अर्थपूर्ण देवाणघेवाण करीत असल्याची खात्रीपूर्वक मनपा वर्तुळात चर्चा आहे. तत्कालीन कर संकलन प्रमुख यांनी विशिष्ट सेवकांना खात्याच्या सोयीसाठी ठेवावे असे निवेदन तत्कालीन महापालिका आयुक्त यांचेकडे सादर केले होते, त्यास मान्यता नसतानाही वरिष्ठ कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या अर्थपूर्ण संमतीने सदर सेवक अद्यापही कर आकारणी खात्यात कामास आहेत हि बाब कार्यालयीन शिस्त भंग करणारी आहे.
कर आकारणी विभाग हा संवेदनशील विभाग असून या खात्यात काही विशिष्ट सेवक हे १० वर्षे ते २० वर्षे इतका काळ पुन्हा पुन्हा त्याच खात्यात पदोन्नती अथवा अन्य मार्गाने प्रत्यक्ष कामास असल्याचे स्पष्ट निर्देशित होते.
कर आकारणी संकलन विभागातील कामकाजाचा पदभार समप्रमाणात विभागणी करणे हे संस्थेच्या आर्थिक हिताचे असताना सद्यस्थितीत पहिल्यांदाच “वरिष्ठ कार्यालयातील अधिकाऱ्याच्या चातुर्याने” नवीन पायंडा पाडून एका अधिकाऱ्याला १० पेठांचे कामकाज, एका अधिकाऱ्याला ५ पेठांचे कामकाज व अन्य अधिकाऱ्यांना २ ते ३ पेठांचे कामकाज देण्यात आले आहे. यामध्ये कामकाजाचा पदभार देताना मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे निर्देशित होते. या प्रकरणी मनपा आयुक्त स्तरावरून पेठांचा पदभार सम प्रमाणात विभागून देण्यात यावा.
कर आकारणी विभागाकडे प्रशासन अधिकारी यांची संख्या ३ असताना ८० टक्के आकारणी करणेचे काम एका प्रशासन अधिकारी यांचेकडे देऊन उर्वरित प्रशासन अधिकारी यांचेकडे नाममात्र पदभार ठेवला आहे. ज्या प्रशासन अधिकारी यांचेकडे खात्याच्या एकूण ८० टक्के आकारणीचे कामकाज आहे त्यांना सन २०२१ मध्ये तात्पुरता प्रभारी कामकाज दिले असून कर आकारणी सारख्या उत्पन्नाच्या दुर्ष्टीने महत्वाचे व संवेदनशील विभागाला अद्याप पूर्ण वेळ अधिकारी मिळत नाही हि दुर्दैवी व अर्थपूर्ण बाब लक्षात घेऊन आपण यामध्ये निश्चित बदल कराल अशी अपेक्षा आहे.

COMMENTS