PMC Employees Time Bound Promotion |  कालबद्ध पदोन्नती बाबत महापालिका कर्मचाऱ्यांना प्रशासनाचा दिलासा

HomeBreaking Newsपुणे

PMC Employees Time Bound Promotion | कालबद्ध पदोन्नती बाबत महापालिका कर्मचाऱ्यांना प्रशासनाचा दिलासा

Ganesh Kumar Mule Sep 06, 2023 2:31 PM

PMC Employees Time Bound Promotion | कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी | कालबद्ध पदोन्नतीसाठी पदोन्नती समिती समोर प्रस्ताव ठेवण्याची आवश्यकता नाही ! | विभाग प्रमुखांना अंतिम मंजुरीचे अधिकार
PMC Pune Employees | Pay Matrix | पुणे महापालिकेच्या प्रशासन अधिकारी, अधिक्षक सह विविध पदांचे वाढणार वेतन!
PMC Pune Employees | पुणे महापालिका प्रशासक तथा आयुक्तांच्या मनमानी कारभाराला राज्य सरकारकडून चपराक

PMC Employees Time Bound Promotion |  कालबद्ध पदोन्नती बाबत महापालिका कर्मचाऱ्यांना प्रशासनाचा दिलासा 

| राज्य सरकारचे मार्गदर्शन येईपर्यंत प्रक्रिया सुरु ठेवणार  

PMC Employees Time Bound Promotion |  पुणे महापालिका कर्मचाऱ्यांना (PMC Pune Employees) सातव्या वेतन आयोगानुसार (7th Pay Commission) देण्यात येणाऱ्या कालबद्धपदोन्नतीचा प्रस्ताव (Time Bound Promotion Proposal) लटकला होता. कारण याबाबतची प्रक्रिया स्थगित ठेवण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त (PMC Additional Commissioner) यांनी दिले होते. याच्या अंमलबजावणी बाबत राज्य सरकार कडून स्पष्टीकरण घेण्यासाठी प्रस्ताव पाठवला आहे. मात्र आता प्रशासना कडून कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यात आला आहे. सरकारचे मार्गदर्शन येईपर्यंत पदोन्नती बाबतची प्रक्रिया सुरु ठेवण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्तांनी सामान्य प्रशासन विभागाला दिले आहेत. दरम्यान सरकारने काही बदल सुचवला तर त्यानुसार कार्यवाही केली जाणार आहे. अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. (PMC Employees Time Bound Promotion)

महापालिका कर्मचाऱ्यांना प्रत्यक्षात नोव्हेंबर 2021 ला  वेतन आयोगानुसार वाढीव वेतन देण्यात आले तरी कालबद्ध पदोन्नतीचा लाभ देण्यात आला नव्हता. याबाबत कर्मचाऱ्यांकडून प्रशासनाकडे पाठपुरावा केला जात होता. त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचा प्रस्ताव तयार करून तो लेखा विभागाच्या माध्यमातून अतिरिक्त आयुक्तांसमोर मान्यतेसाठी ठेवला होता. मात्र अतिरिक्त आयुक्तांनी हा विषय प्रलंबित ठेवला होता. यामुळे महापालिकेवर किती आर्थिक भार येईल, याची माहिती सादर करण्याचे आदेश दिले होते. ही माहिती यायला बराच अवधी गेला. त्यानंतर प्रक्रिया सुरु झाली. कर्मचाऱ्यांची माहिती देखील घेतली जाऊ लागली. मात्र पुन्हा एकदा हा प्रस्ताव रखडला. कारण सरकारचे स्पष्टीकरण येईपर्यंत हा विषय स्थगित ठेवण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त(ज) यांनी दिले होते. (Pune Municipal Corporation Employees) 

मात्र याबाबत महापालिका कामगार संघटनांनी नुकतीच अतिरिक्त आयुक्तांची भेट घेत पदोन्नती बाबत प्रक्रिया सुरु करण्याची मागणी केली. त्यानुसार प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यात आला आहे. सरकारचे मार्गदर्शन येईपर्यंत पदोन्नती बाबतची प्रक्रिया सुरु ठेवण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्तांनी सामान्य प्रशासन विभागाला दिले आहेत. दरम्यान सरकारने काही बदल सुचवला तर त्यानुसार कार्यवाही केली जाणार आहे. (PMC Pune News)

– काय आहे कालबद्ध पदोन्नती

काही महापालिका कर्मचाऱ्यांची महापालिकेत बरेच वर्षे सेवा होते. मात्र काही तांत्रिक कारणामुळे त्यांना पदोन्नतीचे पद मिळत नाही. त्यामुळे पद आणि वेतन अशा दोन्ही पासून कर्मचाऱ्याला वंचित राहावे लागत होते. यावर तोडगा काढण्यात आला. त्यानुसार दोन टप्पे करण्यात आले. ज्या कर्मचाऱ्यांची सेवा 12 वर्ष आणि 24 वर्ष पूर्ण झाली असेल, त्यांना त्यांच्या सेवेनुसार वेतनवाढदेण्यात आली. पद तेच असले तरी कर्मचाऱ्यांना वाढीव वेतन मिळू लागले. 1994 साली हा नियम लागू करण्यात आला. यामध्ये 2003 साली सुधारणा करण्यात आली. त्यानंतर 2013 यात आणखी स्पष्टता आणण्यात आली. मग सातव्या वेतन आयोगानुसार सरकार ने 2016 सालापासून दोन ऐवजी तीन टप्पे केले. त्यामध्ये 10 वर्ष, 20 वर्ष आणि 30 वर्ष असे टप्पे करण्यात आले आहेत. (PMC Pune News)
—-
News Title | PMC Employees Time Bound Promotion | Administration relief to municipal employees regarding time-bound promotions