PMC Employees | प्रतिनियुक्ती वर आलेल्या प्रशासन अधिकाऱ्यांना सरकार कडे परत पाठवा  | महापालिका कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून केले आंदोलन!

Homeadministrative

PMC Employees | प्रतिनियुक्ती वर आलेल्या प्रशासन अधिकाऱ्यांना सरकार कडे परत पाठवा  | महापालिका कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून केले आंदोलन!

Ganesh Kumar Mule Jun 11, 2025 7:46 PM

Pedestrian Day | PMC Pune | पुणे महानगरपालिकेमार्फत जागतिक पादचारी दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन
Chitale Bandhu Mithaiwale | सातत्यपूर्ण प्रयत्न आणि ग्राहकांचा विश्वास हीच यशस्वी उद्योगाची सूत्रे  | संजय चितळे
PMC Contract Employees Portal | कंत्राटी कामगारांसाठी स्वतंत्र पोर्टल तात्काळ सुरू करा | सुनिल शिंदे यांची महापालिका प्रशासनाकडे मागणी

PMC Employees | प्रतिनियुक्ती वर आलेल्या प्रशासन अधिकाऱ्यांना सरकार कडे परत पाठवा  | महापालिका कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून केले आंदोलन!

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) –  राज्य शासनाकडून प्रतिनियुक्तीवर प्रशासन अधिकारी पाठवल्याने पुणे महापालिकेच्या  स्थानिक सेवकांमध्ये नाराजी निर्माण झालेली आहे. याचा निषेध म्हणून महापालिका कर्मचारी संघटना आणि कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा पवित्र घेतला. कर्मचाऱ्यांनी महापालिकेत काळ्या फिती लावून आंदोलन केले. दरम्यान महापालिका आयुक्तांनी यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. (Pune Municipal Corporation – PMC)

राज्य शासनाकडून प्रतिनियुक्तीवर प्रशासन अधिकारी पाठवण्यात आल्याबद्दल कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. मनपा आस्थापनेवर प्रशासन अधिकारी संवर्गातील २५% पदे ही सरळ सेवेने भरण्याची स्पष्ट तरतूद असताना, राज्य शासनाने बाहेरील अधिकारी प्रतिनियुक्तीवर पाठवणे हे स्थानिक कर्मचाऱ्यांवर अन्यायकारक आहे. यामुळे मनपा सेवेत रुजू होऊन प्रशासकीय अधिकारी पदावर पदोन्नतीची अपेक्षा बाळगणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मनोबल खच्ची झाले आहे. त्यांच्या हक्काच्या संधींवर गदा येत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष वाढला आहे. या अन्यायाच्या निषेधार्थ आज,  पुणे महानगरपालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून कामकाज केले.

प्रतिनियुक्तीवरील संबंधित अधिकारी यांना तात्काळ  राज्य शासनाकडे परत पाठवण्याची व्यवस्था करावी. तसेच त्यांना देण्यात आलेला महापालिका सहय्यक आयुक्त पदाचा पदभार तात्काळ काढून घेण्यात यावा. अशी मागणी कर्मचारी संघटनेने महापालिका आयुक्त यांना केली.  मनपा कर्मचाऱ्यांच्या हक्काचे रक्षण करणे आणि त्यांच्या प्रगतीसाठी अनुकूल वातावरण निर्माण करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. आम्हाला आशा आहे की, आपण आमच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून योग्य ती कार्यवाही कराल. असा विश्वास दर्शवत  पुणे महानगरपालिकेतील लेखनिकी संवर्गातील सर्व जागा ह्या १००% पदोन्नतीने भरण्यात याव्यात या करिता सुधारित प्रस्ताव राज्य शासनाकडे मान्यतेसाठी तात्काळ सादर करण्यात यावा. अशी मागणी संघटनेने केली.