PMC Employees Promotion – महापालिकेच्या चतुर्थश्रेणी संवर्गातील २९ कर्मचाऱ्यांना लिपिक टंकलेखक (वर्ग ३) पदावर पदोन्नत्ती
Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेच्या चतुर्थश्रेणी संवर्गातील २९ कर्मचाऱ्यांना लिपिक टंकलेखक (वर्ग ३) पदावर पदोन्नत्ती देण्यात आली आहे. महापालिका अतिरिक्त आयुक्तांनी याबाबतचे आदेश नुकतेच जारी केले आहेत. (Pune Municipal Corporation – PMC)
पुणे महापालिकेत महापालिकेच्या चतुर्थश्रेणी संवर्गातील कर्मचाऱ्यांना लिपिक टंकलेखक (वर्ग ३) पदावर पदोन्नत्ती दिली जाते. पदोन्नतीचे हे पद आहे. त्या माध्यमातून २५% पदोन्नतीने पदे भरली जातात. त्यानुसार लिपिक टंकलेखक ची २९ पदे रिक्त झाली होती. पात्र कर्मचारी पदोन्नत्तीकडे डोळे लावून बसले होते. अखेर चतुर्थश्रेणी संवर्गातील २९ कर्मचाऱ्यांना बढती देण्यात आली आहे. यातील काही कर्मचाऱ्यांना ५ वर्षात पदवी धारण करण्याची अट ठेवण्यात आली आहे. महापालिका अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी पी यांनी हे आदेश जारी केले आहेत.
COMMENTS