PMC Employees Promotion | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या पदाची पदोन्नती प्रक्रिया नव्याने राबवण्याची मागणी
| पुणे महापालिका मागासवर्गीय कर्मचारी संघटनेचे महापालिका आयुक्तांना पत्र
Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिका आस्थापनेवरील सेवकांना कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या पदावर १५% आरक्षणाप्रमाणे पदोन्नती देण्याची मागणी पुणे महापालिका मागासवर्गीय कर्मचारी संघटनेने केली आहे. तसेच पूर्ण पदोन्नती प्रक्रिया पुन्हा नव्याने राबवण्याची मागणी संघटनेने महापालिका आयुक्तांकडे केली आहे. (Pune Municipal Corporation – PMC)
संघटनेच्या निवेदनात म्हटले आहे की, पुणे महानगरपालिका आस्थापनेवरील सेवकांना कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या पदावर पदोन्नती देणेबाबतचा केलेल्या अर्जांचा कालावधी उलटून गेलेला असून विहित मुदतीत सदर प्रक्रिय पूर्ण झालेली नाही. सदर कालावधीमध्ये नव्याने पात्रता धारण केलेल्या सेवकाना संधी मिळण्यासाठी संपूर्ण प्रक्रिया पुन्हा नव्याने राबविणे आवश्यक आहे. पुणे महानगरपालिका आस्थापनेवरील सर्व पात्र सेवकांकडून नव्याने अर्ज मागविण्यात यावेत जेणेकरून सर्व पात्रताधारक सेवकांना पदोन्नतीची समान संधी उपलब्ध होईल व कोणत्याही सेवकावर अन्याय होणार नाही.
त्यामुळे पुणे महानगरपालिका आस्थापनेवरील सेवकाना कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या पदावर पदोन्नती देणेबाबतची संपूर्ण प्रक्रिया पुणे महानगरपालिका सेवा व सेवांचे वर्गीकरण व १५% आरक्षणाप्रमाणे पुन्हा नव्याने करण्यात यावी व न्यायालयीन आदेशास अनुसरून सपूर्ण प्रक्रिया राबविण्यात यावी. अशी मागणी करण्यात आली आहे.
—
जुना आर आर 25% होता तो बदलण्यात आला आणि नवीन आर.आर.हा 15% दुरुस्त करून आणला गेला त्यामध्ये परिक्षा घेण्यासाठी सांगितले गेले, म्हणून काही सेवक हे कोर्टात गेले आहे. अर्ज हे 25%प्रमाणे मागविण्यात आले. परंतु आर आर बदल्यामुळे 15%च्या जागा भरण्यासाठी नव्याने अर्ज मागवले पाहिजे, हे नियमाला धरून होईल असे आमंचे मत आहे.
– रूपेश सोनवणे, अध्यक्ष, पुणे महापालिका मागासवर्गीय कर्मचारी संघटना

COMMENTS