PMC Employees Mental Health | पुणे महापालिका कर्मचारी आणि अधिकारी यांचे मानसिक आरोग्य राखण्याचे काम आता मोबाईल एप करणार!

Homeadministrative

PMC Employees Mental Health | पुणे महापालिका कर्मचारी आणि अधिकारी यांचे मानसिक आरोग्य राखण्याचे काम आता मोबाईल एप करणार!

Ganesh Kumar Mule Jan 16, 2025 9:47 AM

No departmental exam, no degree, no typing yet top position in seniority list!
Pune PMC News | नगरसचिव आणि क्रीडा अधिकारी पदावर नेमणुकी बाबतचे महापालिका आयुक्त यांचे आदेश जारी 
PMC Employees and Officers | पुणे महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या गुणवंत पाल्यांचा बुधवारी सन्मान

PMC Employees Mental Health | पुणे महापालिका कर्मचारी आणि अधिकारी यांचे मानसिक आरोग्य राखण्याचे काम आता मोबाईल एप करणार!

 

PMC Health Department – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेत (Pune Municipal Corporation – PMC) कार्यरत असणा-या अधिकारी व कर्मचारी (PMC Employees officers and Employees) यांना मोठया प्रमाणावर शारीरीक व मानसिक ताणास सामोरे जावे लागते. त्यांचे मानसिक आरोग्य राखणे आणि त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी आता मोबाईल एप ची मदत घेतली जाणार आहे. त्यासाठी १ कोटी २७ लाख खर्च केले जाणार आहेत. या बाबतचा प्रस्ताव आरोग्य खात्याकडून स्थायी समिती (PMC Standing Committee) समोर ठेवण्यात आला आहे. दरम्यान जे तंत्रज्ञान लोकांचे मानसिक आरोग्य खराब करते अशा मोबाईलचा वापर करून मानसिक आरोग्य कसे राखले जाणार, असा प्रश्न मात्र या निमित्ताने उपस्थित होत आहे. शिवाय यावर करोडो खर्च केले जाणार आहेत. यावरून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (Pune PMC News)

पुणे महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचारी यांचे मानसिक आरोग्य राखणे व मनोबल उंचावणेकरीता मेंटलहेल्थ अॅप घेतला जाणार आहे. प्रस्तावात म्हटले आहे कि, शहरीकरण व औदयोगिकरण याचबरोबर सध्याचे असणारे स्पर्धात्मक युग यामुळे नागरीकांमध्ये येणारे मानसिक ताण व या अनुषंगाने मानसिक विकार दिवसेंदिवस मोठया प्रमाणावर वाढत आहेत. या वाढणा-या शहराच्या विस्ताराच्या अनुषंगाने शहरामध्ये व नागरीकांना नागरी सुविधा तत्परतेने पुरविणे क्रमप्राप्त आहे. या सर्व सेवा सुविधा पुरवित असताना मनपामध्ये कार्यरत असणा-या अधिकारी व कर्मचारी यांना मोठया प्रमाणावर शारीरीक व मानसिक ताणास सामोरे जावे लागते. खास करून सर्व अधिकारी व कर्मचारी यांना मानसिक ताण मोठया प्रमाणावर असल्याचे चर्चेतुन जाणवते. याकरीता पुणे महानगरपालिका कर्मचारी व अधिकारी यांचे शारीरीक व मानसिक आरोग्य चांगले ठेवणेकरीता विविध उपायोजना राबवित असतात.

या कामासाठी निविदा प्रक्रिया राबविणेत आली होती. यामध्ये ३ निविदा प्राप्त झाल्या होत्या. मात्र सर्वात कमी दर टचकिन आय सर्विसेस प्रा लि यांचा आला होता. या एपचा वापर करण्यासाठी २००० हजार परवाने घेतले जाणार आहेत. त्याचा प्रति यूनिट दर हा ६३७२ इतका आहे. त्यानुसार १ कोटी २७ लाख इतका खर्च केला जाणार आहे. खात्याने प्रस्तावात म्हटले आहे कि, सीएसआर मधून हा निधी खर्च केला जाऊ शकतो. महापालिकेच्या वर्ग १ ते तीन मधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हा एप दिला जाणार आहे. यावर स्थायी समिती उद्या निर्णय घेणार आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0