PMC Employees Income Tax | आयकर विभागाकडून मिळत असलेल्या नोटीस बाबत काय कार्यवाही करायची ? मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांनी दिले हे निर्देश!

PMC Building

Homeadministrative

PMC Employees Income Tax | आयकर विभागाकडून मिळत असलेल्या नोटीस बाबत काय कार्यवाही करायची ? मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांनी दिले हे निर्देश!

Ganesh Kumar Mule Feb 20, 2025 9:26 PM

AAP Pune | आम आदमी पक्षाचा ११ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
Veer Savarkar | Dilip Vede Patil |  सावरकर सर्वांनी आत्मसात करून अखंड हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकारावे | शरद पोंक्षे
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा झटका|  महागाई भत्त्याबाबत मोठी बातमी | जाणून घ्या काय आहे प्रकरण

PMC Employees Income Tax | आयकर विभागाकडून मिळत असलेल्या नोटीस बाबत काय कार्यवाही करायची ? मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांनी दिले हे निर्देश!

 

PMC Employees – (The Karbhari News Service) – आधार-पॅन लिंक (PAN Aadhaar Link) करण्यासाठी केंद्र सरकारने (Central Government) एक मुदत ठरवून दिली होती. मात्र या कालावधीत हे काम न केल्याने आणि मुदतीत आयकर (Income tax) न भरल्याचा आर्थिक फटका पुणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांना (Pune Municipal Corporation Employees) बसण्याची चिन्हे आहेत. कारण आयकर विभागाकडून दंडाच्या नोटीसा मिळण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान या नोटिस बाबत काय कार्यवाही करायची. याबाबत मुख्य लेखा व वित्त अधिकारी उल्का कळसकर (Ulka Kalaskar PMC) यांनी सर्व विभागांना निर्देश दिले आहेत. (Pune Municipal Corporation – PMC)

काय आहेत निर्देश?

पुणे महानगरपालिकेकडील विविध खात्याच्या TDS दायित्वाबाबत खात्याकडून प्राप्त नियम व सूचना यांचे सर्व DDO / खातेप्रमुख यांना कार्यवाही करणेबाबत वेळोवेळी कळविण्यात आले आहे. सेवकांच्या विविध प्रश्नांबाबत १४ फेब्रुवारी रोजी पी.एम.सी.एम्प्लॉईज युनियन, पुणे व अतिरिक्त महापालिका आयुक्त यांचे समवेत बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यामध्ये विविध खात्यांकडे प्राप्त झालेल्या 24Q ची TDS डिमांड नोटीसबाबत व लोहाडे यांचे नेमणूकीबाबत चर्चा केली. तथापि, लोहाडे यांची नियुक्ती पुणे मनपा कडून करण्यात आलेली नाही. याबाबत युनियनला अवगत करण्यात आले. असे आदेशात म्हटले आहे.

आदेशात पुढे म्हटले आहे की, संबंधित सर्व खात्याकडील DDO / खातेप्रमुख, संबंधित बिल क्लार्क / जबाबदार अधिकारी / कर्मचारी यांनी आयकर खात्याकडील प्राप्त झालेल्या नोटीसांबाबत आपले स्तरावर कार्यवाही करणे आवश्यक आहे. त्यानुसार आता त्या त्या विभागाना यावर कार्यवाही करावी लागणार आहे.