PMC Employees Health Check Up | महापालिका कर्मचाऱ्यांची आज मधुमेह, उच्च रक्तदाब व मुखकर्करोग ची तपासणी | आभा कार्ड आज आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड काढले जाणार

HomeBreaking Newsपुणे

PMC Employees Health Check Up | महापालिका कर्मचाऱ्यांची आज मधुमेह, उच्च रक्तदाब व मुखकर्करोग ची तपासणी | आभा कार्ड आज आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड काढले जाणार

कारभारी वृत्तसेवा Dec 22, 2023 2:20 AM

World Health Day | जागतिक आरोग्य दिन 2024 : जागतिक आरोग्य दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या महत्व आणि इतिहास 
Navratri | Women Special | घरोघरी बायका वजन वाढीने वेगवेगळ्या दुखण्याने त्रस्त आहेत | त्यांनी आरोग्याची काळजी कशी घ्यावी? वाचा सविस्तर
How to Prevent Diabetes | जर तुम्हाला मधुमेह नसेल तर ते चांगलेच आहे | मात्र भविष्यात तो टाळण्यासाठी ही पावले उचला

PMC Employees Health Check Up | महापालिका कर्मचाऱ्यांची आज मधुमेह, उच्च रक्तदाब व मुखकर्करोग ची तपासणी

| आभा कार्ड आज आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड काढले जाणार

PMC Employees Health Check up | पुणे महानगरपालिका भवन (PMC Main Building) येथील विविध विभागांतर्गत सर्व संवर्गातील कार्यरत सर्व पुरुषांची (अधिकारी, कर्मचारी व नागरिक) आरोग्य तपासणी करणेकरिता शिबिराचे (Health Camp) आयोजन करण्यात आले आहे. यात आभा कार्ड (Aabha Card) आज आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड (Ayushman Bharat Yojana Card) काढले जाणार आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन आरोग्य प्रमुख डॉ भगवान पवार (Health Officer Dr Bhagwan Pawar) यांनी केले आहे. (Pune Municipal Corporation)


या शिबिरामध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब व मुखकर्करोग यांची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच सदर शिबीरामध्ये आभा कार्ड व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे कार्ड काढण्यात येणार आहे. हे शिबीर 22 डिसेंबर म्हणजे आज सकाळी १०:०० ते ०४:०० वा या वेळेत जुना जी.बी. हॉल शेजारी, कै.प्रकाश कर्दळे माहिती अधिकार वाचनालय, तिसरा मजला, मुख्य इमारत, पुणे महानगरपा आयोजित करण्यात आले आहे. (PMC Pune News)

या शिबीरामध्ये जास्तीत जास्त कर्मचान्यानी आरोग्य तपासणी करणेसाठी आभा कार्ड व आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे कार्ड काढणेसाठी सर्व खाते प्रमुखांनी आपल्या अधिनस्त असणाऱ्या अधिकारी/कर्मचारी यांना सदर शिबीरामध्ये उपस्थित राहणेबाबत अवगत करावे. असे डॉ पवार यांनी म्हटले आहे.

—–