PMC Employees Ganeshotsav | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांच्या गणेशोत्सव मंडळाचे यंदा ५१ वे वर्ष | अतिरिक्त आयुक्त यांच्या हस्ते श्रीं ची प्रतिष्ठापना
Prithviraj B P IAS – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिका सेवक वर्ग गणेशोत्सव समिती मंडळाच्या श्रीं ची प्रतिष्ठापना अतिरिक्त महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी पी यांचे शुभहस्ते करण्यात आली. (Pune Municipal Corporation – PMC)
मंडळाचे यंदाचे 51वे वर्ष असून मंडळांनी यावर्षी त्रिगुणात्मक श्री गुरुदेव दत्त यांची भव्य प्रतिकृती साकारण्यात आली आहे. मंडळातर्फे नागरिकांना जनजागृती पर सामाजिक संदेश देण्यासाठी विविध विषयांचे प्रबोधनात्मक संदेश तयार करण्यात आले असून हे संदेश दृकश्राव्य माध्यमातून सादर होणार आहेत.
श्रीची प्रतिष्ठापना करण्यापूर्वी सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक माननीय लोकमान्य टिळक यांचे पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी नितीन केंजळे मुख्य कामगार अधिकारी, अध्यक्ष अशोक नटे व कार्यकारिणी सदस्य महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त यांनी पुणेकर नागरिकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
COMMENTS