PMC Employees Festival Advance | महापालिका कर्मचाऱ्यांसाठी सणांच्या उचल रकमेत वाढ करण्याचे मुख्य लेखा व वित्त विभागाचे सर्क्युलर जारी

PMC Employees

HomeBreaking News

PMC Employees Festival Advance | महापालिका कर्मचाऱ्यांसाठी सणांच्या उचल रकमेत वाढ करण्याचे मुख्य लेखा व वित्त विभागाचे सर्क्युलर जारी

Ganesh Kumar Mule Aug 19, 2024 6:26 PM

Ganesh Visarjan Holiday | गणेश विसर्जनाच्या सुट्टीबाबत पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्तांचे आदेश जारी
PMC Seniority List | विविध संवर्गातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सेवाज्येष्ठता यादीत भरपूर उणिवा!  | रमेश शेलार यांनी नोंदवला आक्षेप 
PMC Pune Employees Promotion | उपअधिक्षक पदाची पदोन्नती लटकली | सरकारने मान्यता देऊन देखील ६ महिन्यांपासून पदोन्नती नाही 

PMC Employees Festival Advance | महापालिका कर्मचाऱ्यांसाठी सणांच्या उचल रकमेत वाढ करण्याचे मुख्य लेखा व वित्त विभागाचे सर्क्युलर जारी

 

PMC Employees Festival Advance – (The Karbhari News Service) – पुणे महापालिका (Pune Municipal Corporation Employees) कर्मचाऱ्यांना सणासाठी म्हणून १० हजाराची उचल रक्कम बिनव्याजी दिली (Festival Advance) जात होती. जी दहा समान हप्त्यात वसूल केली जाते. ही रक्कम आता २० हजार इतकी केली जाणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला नुकतीच स्थायी समिती (PMC Standing Committee) आणि मुख्य सभेने मान्यता दिली होती. त्यानंतर आता महापालिकेच्या मुख्य लेखा व वित्त विभागाने याबाबतचे सर्क्युलर जारी केले आहे. येणाऱ्या सणांच्या पर्श्वभूमीवर महापालिका कर्मचाऱ्यांसाठी हा दिलासा मानला जात आहे. (Pune Municipal Corporation (PMC)

पुणे महानगरपालिकेतील सर्व कर्मचा-यांना सणासाठी उचल म्हणून प्रचलित कार्यपध्दती नुसार सरसकट १०,००० प्रतिवर्षी अदा करून प्रचलित कार्यपध्दतीनुसारच दहा समान मासिक व्याजरहित हप्त्यामध्ये वसुली करण्यास मान्यता देण्यात आली आहे. दरम्यान पुणे महानगरपालिका कामगार युनियन आणि माजी नगरसेवकांनी महापालिका आयुक्त यांजकडे सध्या देण्यात येणारी सणासाठी उचल १०,०००/- पुरेशी नसल्याने ती २०,०००/- इतकी अदा करण्यात यावी. अशी मागणी केली होती. त्यानुसार प्रशासनाने प्रस्ताव तयार केला होता. याबाबतच्या प्रस्तावाला नुकतीच स्थायी समिती (PMC Standing Committee) आणि मुख्य सभेने मान्यता दिली होती. त्यानंतर आता महापालिकेच्या मुख्य लेखा व वित्त विभागाने याबाबतचे सर्क्युलर जारी केले आहे. येणाऱ्या सणांच्या पर्श्वभूमीवर महापालिका कर्मचाऱ्यांसाठी हा दिलासा मानला जात आहे. दरम्यान याबाबतच्या अटीमध्ये कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. असे मुख्य लेखा व वित्त अधिकारी उल्का कळसकर यांनी जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे. (Pune PMC News)

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0