PMC Employees Diwali Bonus | पुणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या खात्यात सानुग्रह अनुदान जमा 

HomeपुणेBreaking News

PMC Employees Diwali Bonus | पुणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या खात्यात सानुग्रह अनुदान जमा 

कारभारी वृत्तसेवा Nov 06, 2023 4:42 PM

कसबा पोटनिवडणुक | छोट्या पक्षांचा पाठिंबा मिळविण्यावर काँग्रेस, भाजपचा भर
Lad Page Committee | कंत्राटी कामगारांचा विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा 
Sandip Khalate PMC | अतिक्रमण विभागाचे उपायुक्त आता संदीप खलाटे!

PMC Employees Diwali Bonus | पुणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या खात्यात सानुग्रह अनुदान जमा

| महापालिका कर्मचाऱ्यांना प्रशासनाकडून दिवाळीची भेट

PMC Employees Diwali Bonus | पुणे |  महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना (PMC Employees and Officers) दिवाळी बोनस (Diwali Bonus) अर्थात सानुग्रह अनुदान आणि बक्षिसी दिली जाते. यंदा कर्मचाऱ्यांना च्या मूळ वेतन + महागाई भत्ता यावर 8.33% + 21,000 इतके सानुग्रह अनुदान दिले जाणार होते. त्यानुसार आज संध्याकाळी कर्मचाऱ्यांच्या खात्यात बोनस जमा झाला आहे. यामुळे कर्मचारी वर्गात खुशीचे वातावरण आहे.
 वित्त व लेखा विभागाने (PMC Chief Account and Finance Department) 9 ऑक्टोबर ला बोनस बाबतचे परिपत्रक (Bonus Circular) जारी केले असून सर्व खात्यांना त्यानुसार सूचना केल्या होत्या. 30 ऑक्टोबर पर्यंत सर्व बिले तपासून घेण्यास सांगण्यात आले होते. दरम्यान दरवर्षी दिवाळी तोंडावर आल्यावर परिपत्रक काढले जाते. मात्र यंदा महिनाभर आधीच परिपत्रक काढून प्रशासनाने कर्मचाऱ्यांना दिलासा दिला होता. मात्र तरीही बोनस मिळत नव्हता. कर्मचाऱ्यांना अपेक्षा होती कि मागील शुक्रवारी बोनस मिळेल कारण शनिवार आणि रविवारी खरेदीला वेळ मिळेल. मात्र तसे न झाल्याने कर्मचारी नाराज होते. मात्र आज संध्याकाळी बोनस जमा झाल्याने कर्मचारी खुश आहेत. दरम्यान येत्या दोन दिवसांत वेतन देखील होणार आहे. असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. (PMC Pune Diwali Bonus)