PMC Employees Departmental Exam | वरिष्ठ लिपिक, लिपिक टंकलेखक पदावरील कर्मचाऱ्यांच्या माहितीत विसंगती  | लेखनिकी संवर्गासाठी विभागीय परीक्षेचे आयोजन

Homeadministrative

PMC Employees Departmental Exam | वरिष्ठ लिपिक, लिपिक टंकलेखक पदावरील कर्मचाऱ्यांच्या माहितीत विसंगती  | लेखनिकी संवर्गासाठी विभागीय परीक्षेचे आयोजन

Ganesh Kumar Mule Sep 12, 2025 8:34 PM

Pune PMC News | मागासवर्गीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समस्येबाबत आढावा बैठक | राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचा 6 ते 8 ऑगस्ट रोजी दौरा
PMC Gunvant Kamgar Purskar | गुणवंत कामगार पुरस्कारासाठी महापालिका कर्मचारी उदासीन का? | अर्ज करण्यासाठी अजून एकदा मुदतवाढ
OPS PMC Employees  | १ नोव्हेंबर २००५ पूर्वी जाहिरात प्रसिद्ध झालेल्या ४२५ कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू! महापालिका अतिरिक्त आयुक्त यांचे आदेश

PMC Employees Departmental Exam | वरिष्ठ लिपिक, लिपिक टंकलेखक पदावरील कर्मचाऱ्यांच्या माहितीत विसंगती  | लेखनिकी संवर्गासाठी विभागीय परीक्षेचे आयोजन

 

M J Pradip Chandren IAS – (The Karbhari News Service) – विभागीय परिक्षेसाठी  ३० एप्रिल  पूर्वी लिपिक टंकलेखक या पदावर कार्यरत असलेल्या, यापूर्वी घेण्यात आलेली विभागीय परीक्षा अनुत्तीर्ण असलेल्या, समाविष्ट ग्रामपंचायतीकडून पुणे महानगरपालिकेत वरिष्ठ लिपिक या पदावर समावेशन केलेल्या उक्त नमूद दिनांकास कार्यरत असलेल्या सेवकांची माहिती मागविण्यात आलेली होती. विविध खात्यांकडून प्राप्त झालेल्या माहितीची तपासणी केली असता प्राप्त झालेली माहिती व सामान्य प्रशासन विभागाकडील उपलब्ध माहिती यामध्ये बऱ्याच प्रमाणात विसंगती दिसून येत आहे. त्यामुळे आता लेखनिकी संवर्गासाठी विभागीय परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. या बाबतचे परिपत्रक अतिरिक्त आयुक्त एम जे प्रदीप चंद्रन यांनी जारी केले आहे. (PMC Pune News)

पुणे महानगरपालिका सेवा (सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण) नियम २०१४ मधील पुणे महानगरपालिका कर्मचाऱ्यांसाठी (अर्हताकारी विभागीय परिक्षा) नियम २०१४ अन्वये पुणे मनपा आस्थापनेवरील प्रशासकीय संवर्गातील (लिपिक व वरिष्ठ लिपिक पदावरील कर्मचाऱ्यांसाठी) विभागीय परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे.

विविध विभागांकडून प्राप्त माहितीमध्ये बऱ्याच कर्मचाऱ्यांची नावे नसल्याबाबत काही कर्मचाऱ्यांनी सामान्य प्रशासन विभागामध्ये समक्ष भेटून कळविले आहे. तसेच काही कर्मचाऱ्यांची विषयांची परीक्षा झालेली असली तरी खात्याकडून प्राप्त माहितीमध्ये कोणतीही माहिती भरलेली दिसत नाही. अशा विसंगत माहितीमुळे काही कर्मचारी विभागीय परीक्षेपासून वंचित राहू शकतात व त्यामुळे त्यांचे पदोन्नतीमध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात.

तरी सर्व विभागांनी संदर्भ क्र. ३ आणि ४ चे विभागीय परीक्षेचे निकाल व त्यानुसार घेणेत आलेली संबंधित सेवकांचे सेवापुस्तकातील नोंद याची संपूर्ण शहानिशा करूनच उपरोक्त नमूद केलेनुसार कर्मचाऱ्यांची सुधारित माहिती   २२ पर्यत Microsoft Excel Sheet, Arial Unicode MS या फॉन्टमध्ये सॉफ्टकॉपीमध्ये (recruitment@punecorporation.org) या ई-मेल वर आणि हार्ड कॉपी तसेच या परिपत्रकासोबत समाविष्ट केलेल्या दाखल्याच्या नमुन्यानुसार संबधित खातेप्रमुखांच्या स्वाक्षरीनेच सामान्य प्रशासन विभागाकडे फेरसादर करणे अनिवार्य आहे.

खात्यांकडून विसंगत / चुकीची माहिती प्राप्त झाल्यामुळे एखादा सेवक विभागीय परीक्षेपासून व त्यामुळे पदोन्नतीपासून वंचित राहिल्यास याबाबतची सर्वस्वी जबाबदारी संबंधित खातेप्रमुख यांची राहील. असा इशारा अतिरिक्त आयुक्त एम जे प्रदीप चंद्रन यांनी दिला आहे.

विभागीय परीक्षा विहित मुदतीत उत्तीर्ण न झाल्यास पुणे महानगरपालिका सेवा (सेवाप्रवेश व सेवांचे वर्गीकरण) नियम, २०१४ मधील परिशिष्ट ३ मधील नियम ९ मधील तरतूदीप्रमाणे संबंधित सेवकांना सेवाज्येष्ठता गमवावी लागेल याविषयीची समज खातेप्रमुख यांनी त्यांचे अधिनस्त कार्यरत असणाऱ्या सर्व सेवकांना देवून त्यांची स्वाक्षरी घेण्यात घ्यावी. एखाद्या सेवकाची माहिती सादर न केल्यास, या कार्यालयीन परिपत्रकाप्रमाणे समज न दिल्यास संबंधित सेवकाच्या होणाऱ्या संभाव्य नुकसानीस संबंधित खातेप्रमुख जबाबदार राहतील. असे देखील अतिरिक्त आयुक्त यांनी म्हटले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: