PMC Employees | आयुक्त साहेब आम्हांला न्याय द्या | आमच्या समस्या तुम्ही तरी ऐकून घ्या | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांची आयुक्तांना साद! 

HomeपुणेBreaking News

PMC Employees | आयुक्त साहेब आम्हांला न्याय द्या | आमच्या समस्या तुम्ही तरी ऐकून घ्या | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांची आयुक्तांना साद! 

गणेश मुळे Jul 10, 2024 2:48 PM

Arvind Shinde | PMC Encroachment Action | अरविंद शिंदे यांचा महापालिकेच्या बांधकाम विभागाला दणका
Pune Airport New Terminal | विमानतळ टर्मिनल चालू होण्यास एक वर्षाचा उशीर | भाजपच्या संथ कारभाराचा प्रवाशांना मनःस्ताप | माजी आमदार मोहन जोशी यांची टीका
Ghanbhatta Varas Hakka | कोर्टाचे आणि सरकारचे आदेश होऊन देखील महापालिका कर्मचारी वारसा हक्कापासून वंचित!

PMC Employees | आयुक्त साहेब आम्हांला न्याय द्या | आमच्या समस्या तुम्ही तरी ऐकून घ्या | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांची आयुक्तांना साद!

PMC Employees – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेमध्ये (Pune Municipal Corporation (PMC) वर्ग एक ते वर्ग तीन मधील विविध संवर्गामध्ये काम करणाऱ्या सेवकांना सामान्य प्रशासन विभाग (PMC General Administration Department) यांच्याकडून न्याय मिळत नसल्याची तक्रार कर्मचाऱ्याकडून व्यक्त करण्यात येत आहे. कारण कर्मचाऱ्यांची पदोन्नती, बदल्या, सेवाज्येष्ठता या बाबत कर्मचाऱ्यांवर सातत्याने अन्याय होत आहे. त्यामुळे  आयुक्त साहेब आम्हांला न्याय द्या. आमच्या समस्या तुम्ही तरी ऐकून घ्या. अशी आर्त साद कर्मचाऱ्यांनी महापालिका आयुक्तांना घातली आहे. (PMC Commissioner)

महापालिका प्रशासन कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवत नसल्यामुळे हे सर्व सेवक विभागीय आयुक्त कार्यालयाकडे न्याय मागण्यासाठी धाव घेत आहेत. पुणे महानगरपालिकेचे आयुक्त व अतिरिक्त महापालिका आयुक्त (जनरल) यांनी या विषयाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी सेवकांकडून होत आहे. सामान्य प्रशासन विभाग हा सेवकांच्या अर्जाचा काहीही विचार करत नाही. तसेच वरिष्ठा पुढे चुकीचे निवेदने ठेवून प्रकरणे प्रलंबित ठेवत आहे. अशा प्रकारचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे सेवकांवर सेवकांवर अन्याय होत असून सेवकांचा सेवेमधील मनापासून काम करण्याच्या वृत्तीला आळा बसत आहे. (Pune PMC News)
मनमर्जीतील अधिकाऱ्यांना सर्व नियम पायदळी तुडवून प्रभारी पदभार देणे त्यांना वरिष्ठ पदी अभय देणे. असे प्रकार सामान्य प्रशासन विभागात घडत आहेत.  सामान्य प्रशासन विभागातील सेवक हे त्याच खात्यामध्ये लिपिक वरिष्ठ लिपिक,  अधीक्षक, सहाय्यक महापालिका आयुक्त अशी पदे स्वतःसाठी निर्माण करून नेमणुका घेत आहेत. या सर्व मनमानी प्रमाणे कारभाराला आला घालण्यात यावा. अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. तसेच ज्याप्रमाणे सर्वसामान्य नागरिकांना लोकशाही दिन यामध्ये न्याय मागता येतो, त्याप्रमाणे दर तीन महिन्यांनी सेवकांसाठी समस्या सोडवणारा दिन आयुक्तांमार्फत निर्माण करण्यात यावा. अशी विनंती कर्मचाऱ्यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.