PMC Employees Advance | महापालिका कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी | सणांच्या उचल रकमेत वाढ करण्याचा प्रस्ताव!

HomeBreaking Newsपुणे

PMC Employees Advance | महापालिका कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी | सणांच्या उचल रकमेत वाढ करण्याचा प्रस्ताव!

गणेश मुळे Jul 24, 2024 6:11 AM

Ganesh Visarjan Holiday | गणेश विसर्जनाच्या सुट्टीबाबत पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्तांचे आदेश जारी
National Commission for scheduled castes | राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने महापालिका आयुक्तांना पुन्हा फटकारले!
Pratibha Patil PMC | मतदान केल्याचा महापालिका कर्मचाऱ्यांना द्यावा लागणार अहवाल!  | उपायुक्त प्रतिभा पाटील यांचे आदेश 

PMC Employees Advance | महापालिका कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी | सणांच्या उचल रकमेत वाढ करण्याचा प्रस्ताव!

PMC Employees Advance – (The Karbhari News Service) पुणे महापालिका कर्मचाऱ्यांसाठी (Pune Municipal Corporation Employees) आनंदाची बातमी आहे. कर्मचाऱ्यांना सणासाठी म्हणून १० हजाराची उचल रक्कम बिनव्याजी दिली जाते. जी दहा समान हप्त्यात वसूल केली जाते. ही रक्कम आता २० हजार इतकी केली जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडून स्थायी समिती (PMC Standing Committee) समोर ठेवण्यात आला आहे. (Pune Municipal Corporation (PMC)

पुणे महानगरपालिकेतील सर्व कर्मचा-यांना सणासाठी उचल म्हणून प्रचलित कार्यपध्दती नुसार सरसकट र१०,०००/- ( दहा हजार फक्त) प्रतिवर्षी अदा करून प्रचलित कार्यपध्दतीनुसारच दहा समान मासिक व्याजरहित हप्त्यामध्ये वसुली करण्यास मान्यता देण्यात आली आहे. दरम्यान पुणे महानगरपालिका कामगार युनियन यांनी महापालिका आयुक्त यांजकडे सध्या देण्यात येणारी सणासाठी उचल  १०,०००/- पुरेशी नसल्याने ती  २०,०००/- इतकी अदा करण्यात यावी. अशी मागणी केली होती. तसेच सुधीर जानजोत, माजी सभासद, यांनी देखील पत्र दिले होते. महागाईत प्रचंड वाढ झालेली असल्याने, सन साजरे करण्यास अडचण होत असल्याने चालू वर्षीपासून देण्यात येणारी सणासाठी उचल २०,०००/- करण्यात यावी, असे जानज्योत यांनी म्हटले होते.  त्यानुसार प्रशासनाने प्रस्ताव तयार केला आहे. (Pune PMC News)

प्रस्तावात म्हटले आहे की, सेवक संख्या व प्रती सेवक १०,०००/- इतकी सणासाठी उचल विचारात घेऊन  २०२४-२५ च्या अंदाजपत्रकात १८ कोटी इतकी तरतुद केली आहे.  १०,०००/- सणासाठी उचल यावरून र.रु.२०,०००/- इतकी म्हणजे दोन पटीने एकावेळेस करणे झाल्यास सेवक संख्या १७६०० करिता ३५,२०,००,०००/- इतकी तरतूद करणे आवश्यक ठरेल. त्यामुळे कमी पडणारी उर्वरित रक्कम तसलमात दुबेरजी

खात्याचे अंदाजपत्रकातील जमा व खर्च बाजू आवश्यक त्या प्रमाणात वाढवून घेणे आवश्यक ठरेल. तसेच, सेवक संख्या व प्रती सेवक २०,०००/- इतकी सणासाठी उचल देण्याबाबतची मान्यता स्थायी समिती मार्फत मा. मुख्य सभेची घेणे आवश्यक आहे. त्यानुसार प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.