PMC Election Results | आज मतदान पार पडले | आता उद्या निकाल ! 15  ठिकाणी मतमोजणी!

Homeadministrative

PMC Election Results | आज मतदान पार पडले | आता उद्या निकाल ! 15 ठिकाणी मतमोजणी!

Ganesh Kumar Mule Jan 15, 2026 10:21 PM

Vetal Tekadi Trek | शिवसेना ठाकरे गटाकडून वेताळ टेकडी ट्रेकचे आयोजन
PMC Employees Promotion | स्नेहल हरपळे यांना उद्यान अधिक्षक पदावर पदोन्नती!
Water Storage | पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली | चार धरणामध्ये 50% हून अधिक पाणीसाठा 

PMC Election Results | आज मतदान पार पडले | आता उद्या १५ ठिकाणी मतमोजणी!

 

PMC Election 2026 – (The Karbhari News Service) –  राज्य निवडणूक आयोग आदेशानुसार पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक सन २०२५-२६ करिता आज ४०११ मतदान केंद्रांवर मतदान पार पडले. मतदानाची अंतिम आकडेवारी अजून प्रसिद्ध करण्यात आली नाही. मात्र सरासरी ५४% मतदान झाल्याचा अंदाज आहे. मागील निवडणुकीत म्हणजे २०१७ ला ५५.५२% इतके मतदान झाले होते. (Pune Municipal Corporation – PMC)

उद्या सकाळी १०.०० वाजता १५ निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून सुनिश्चित करण्यात आलेल्या १५ ठिकाणी मतमोजणी होणार आहे.

 मतमोजणीची ठिकाणे खालीलप्रमाणे आहेत.

१. निवडणूक निर्णय अधिकारी, येरवडा कळस धानोरी यांची मतमोजणी कै.राजाराम भिकू पठारे स्टेडियम, खराडी, पुणे ४११०१४ येथे होणार आहे.

२. निवडणूक निर्णय अधिकारी, नगर रोड वडगाव शेरी यांची मतमोजणी नगर रोड वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालय, नवीन इमारत, पुणे ४११०१४ येथे होणार आहे.

३. निवडणूक निर्णय अधिकारी, शिवाजीनगर घोले रोड यांची मतमोजणी कृषी महाविद्यालय मैदान, शिवाजीनगर, पुणे ४११००५ येथे होणार आहे.

४. निवडणूक निर्णय अधिकारी, औंध बाणेर यांची मतमोजणी शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी, पुणे ४११०४५ येथे होणार आहे.

५. निवडणूक निर्णय अधिकारी, कोथरूड बावधन यांची मतमोजणी एम आय टी येथे डब्ल्यू.पी.यु. वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, द्रोणाचार्य बिल्डिंग पहिला मजला, कोथरूड, पुणे ४११०३८ येथे होणार आहे.

६. निवडणूक निर्णय अधिकारी, कै बा स ढोले पाटील रोड यांची मतमोजणी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद स्मारक, बर्निंग घाट रोड, कोरेगाव पार्क, पुणे ४११००१ येथे होणार आहे.

७. निवडणूक निर्णय अधिकारी, हडपसर मुंढवा यांची मतमोजणी रयत शिक्षण संस्थेचे साधना विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, कर्मवीर सभागृह, हडपसर, पुणे ४११०२८ येथे होणार आहे.

८. निवडणूक निर्णय अधिकारी, वानवडी रामटेकडी यांची मतमोजणी जिजाऊ मंगल कार्यालय, एसआरपीएफ कॅम्प युनिट १, वानवडी, पुणे ४११०२२ येथे होणार आहे.

९. निवडणूक निर्णय अधिकारी, बिबवेवाडी यांची मतमोजणी कै. बाबुराव सणस क्रीडांगण, बॅडमिंटन हॉल जवळील कब्बडी मैदान, सारसबागे शेजारी, स्वारगेट, पुणे ४११०३० येथे होणार आहे.

१०. निवडणूक निर्णय अधिकारी, भवानी पेठ यांची मतमोजणी रफी अहमद किडवाई उर्दू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, तळमजला हॉल (पुणे मनपा), ५३१, भवानी पेठ, रामोशी गेट पोलीस चौकी जवळ, पुणे ४११००२ येथे होणार आहे.

११. निवडणूक निर्णय अधिकारी, कसबा विश्रामबाग वाडा यांची मतमोजणी डी.ई.एस. न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड, पुणे ४११०३० येथे होणार आहे.

१२. निवडणूक निर्णय अधिकारी, वारजे कर्वेनगर यांची मतमोजणी पंडित दीनदयाळ उपाध्याय इंग्रजी माध्यम शाळा, पौड फाटा, पुणे ४११०५२ येथे होणार आहे.

१३. निवडणूक निर्णय अधिकारी, सिंहगड रोड यांची मतमोजणी श्री शरदचंद्रजी पवार अकॅडमी ऑफ ई – लर्निंग स्कूल, वडगाव बुद्रुक, पुणे ४११०५१ येथे होणार आहे.

१४. निवडणूक निर्णय अधिकारी, धनकवडी सहकारनगर यांची मतमोजणी धनकवडी सहकारनगर क्षेत्रीय कार्यालय, प्रांगणातील बंदिस्त पत्रा शेड येथे, कै. राजीव गांधी प्राणी संग्रहालया समोर, पीएमपीएमएल डेपो लगत, कात्रज, पुणे – ४११०४६ येथे होणार आहे.

१५. निवडणूक निर्णय अधिकारी, कोंढवा येवलेवाडी यांची मतमोजणी छत्रपती संभाजी महाराज ई-लर्निंग स्कूल, गोकुळनगर हेमी पार्क जवळ, हॉटेल न्यू एकादशी जवळ, कात्रज कोंढवा रोड, पुणे ४११०४६ येथे होणार आहे.

मतमोजणीच्या ठिकाणी सर्व १५ निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडून तयारी पूर्ण करण्यात आलेली आहे. अशी माहिती प्रशासनच्या वतीने देण्यात आली.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: