PMC Election Final Ward Structure 2025 | पुणे महापालिका निवडणुकीच्या अंतिम प्रभाग रचनेस राज्य निवडणूक आयोगाची मान्यता | गॅझेटमध्ये सोमवारी प्रसिद्ध होणार!
Pune PMC Election 2025 – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या अंतिम प्रभाग रचनेस राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिलेली आहे. प्राधिकृत अधिकारी यांनी दिलेल्या अहवालानुसार ही मान्यता मिळालेली आहे. दरम्यान अंतिम वॉर्ड रचना गॅझेटमध्ये सोमवार पर्यंत प्रसिद्ध होईल. अशी माहिती महापालिका उपयुक्त प्रसाद काटकर यांनी दिली. (Pune Municipal Corporation Election 2025)
पुणे महापालिका निवडणुकी प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली होती. त्यावर नागरिकांना हरकती आणि सूचना देण्यासाठी ४ सप्टेंबर दुपारी ३ पर्यंत कालावधी देण्यात आला होता. त्यानुसार नागरिकांनी प्रतिसाद देणे सुरू केले होते. शेवटच्या दिवशी हरकती आणि सूचनांचा अक्षरशः पाऊस पडला. प्रभागाची नावे बदलणे, नैसर्गिक हद्दी बाबत नागरिकांनी हरकती घेतल्या होत्या. एकूण ५८४३ हरकती आणि सूचना आल्या होत्या.
हरकती सूचनांवर सुनावणीसाठी शासनाचा प्राधिकृत अधिकारी नेमण्यात आला होता. प्रारूप प्रभाग रचनेबाबत प्राप्त हरकती / सूचना वरील जाहीर सुनावणी व्ही.राधा, अपर मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई (महाराष्ट्र शासन, नगर विकास विभाग प्राधिकृत अधिकारी) यांच्या समोर ११ आणि १२ सप्टेंबर या दिवशी झाली. त्यानंतर शासनाचे प्राधिकृत अधिकारी यांनी महापालिका आयुक्त यांच्या मार्फत अंतिम प्रभाग रचना नगर विकास विभागाकडे सादर केली. आपल्या शिफारशी सहित हा अहवाल पाठवण्यात आला होता. त्यानुसार तिम प्रभाग रचनेस राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिलेली आहे. प्राधिकृत अधिकारी यांनी दिलेल्या अहवालानुसार ही मान्यता मिळालेली आहे. दरम्यान अंतिम वॉर्ड रचना गॅझेटमध्ये सोमवार पर्यंत प्रसिद्ध होईल. अशी माहिती महापालिका उपयुक्त प्रसाद काटकर यांनी दिली.

COMMENTS