PMC Election Department | आदर्श आचारसंहिता जारी झाल्यावर तात्काळ पक्षांच्या जाहिराती, बॅनर काढून टाकण्याचे आदेश
| उपायुक्त चेतना केरुरे यांच्या सर्व विभागांना सूचना
PMC Election Department – (The Karbhari News Service) – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या (Loksabha Election 2024) अनुषंगाने राज्यात लवकरच आदर्श आचार संहिता (Ideal Code of Conduct) लागू होण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने आचारसंहिता लागू झाल्यावर तात्काळ सार्वजनिक ठिकाणचे राजकीय फ्लेक्स, बॅनर, पक्षांच्या जाहिराती काढून टाकण्याचे आदेश महापालिका निवडणूक विभागाच्या उपायुक्त चेतना केरुरे (Chetna Kerure PMC) यांनी सर्व विभाग आणि क्षेत्रीय कार्यालयांना दिले आहेत. (Pune Municipal Corporation (PMC)
भारत निवडणूक आयोगाने निवडणुका मुक्त व निष्पक्ष वातावरणात पार पाडण्यासाठी आचार संहिता लागू होण्याच्या कालावधीत जाहिरातींच्या प्रकाशना संदर्भात वेळोवेळी देण्यात आलेल्या सूचना अधिक्रमित करून एकत्रित सूचना निदर्शनास आणल्या आहेत. पत्रातील सूचना सर्व सबंधित यंत्रणांच्या निदर्शनास आणून त्यांना सुचनांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना देण्याबाबत कळविणेत आलेले आहे.
तसेच आदर्श आचार संहिता लागू झालेनंतर मालमत्तेच्या विरुपणास प्रतिबंध करण्याकरिता अधिनियम १९९५ अंतर्गत आपले कार्यक्षेत्रातील शासकीय संपत्तीच्या भिंतीवरील लेखन, पोस्टर / पेपर्स किंवा कटआऊट / होर्डिंग्ज / बंनर्स / झेंडे तसेच शासकीय बसेस वरील पक्षाच्या जाहिराती, सार्वजनिक ठिकाणी जसे रेल्वे स्टेशन बसस्टॅंड, विमानतळ, रेल्वेपूल, रस्ते, इलेक्ट्रीक / टेलिफोन खांब, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इमारती इत्यादी निवडणुका जाहीर झाल्या नंतर काढून टाकणेबाबतची कार्यवाही करण्यात यावी. असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी पुणे यांनी कळविले आहे. त्यानुसार आदर्श आचार संहितेचे पालन होणेकामी आपले स्तरावरावरून योग्य ती कार्यवाही करावी. असे आदेशात म्हटले आहे.
—–