PMC Election Code of Conduct | पुणे महापालिका आयुक्तांकडून आचारसंहिते बाबत आदेश जारी
PMC Election January 2026 – (The Karbhari News Service) – राज्य निवडणूक आयोगाने पुणे महापलिका निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. शिवाय तत्काळ आचारसंहिता देखील लागू केली आहे. त्यानुसार महापलिका आयुक्त नवल किशोर राम (Naval Kishore Ram IAS) यांनी आचारसंहिते बाबत आदेश जारी केले आहेत. (Pune Corporation Election)
महापालिका आयुक्त यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे कि, पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. तसेच सार्वत्रिक निवडणूक कालावधीकरिता आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे. सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता ही पुणे महानगरपालिकेच्या संपूर्ण क्षेत्रासाठी लागू राहील. राज्य निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहितेबाबत एकत्रित आदेश पारित केले आहेत. यामधील सूचनांचे पालन करून आदर्श आचारसंहिता भंग होणार नसल्याची दक्षता घ्यावी. सदर सूचना आपल्या अधिनस्त सर्व विभांगाना लेखी निदर्शनास आणून देऊन सदर सूचनांचे अनुपालन सादर करण्याची दक्षता घ्यावी. असे आदेश आयुक्तांनी प्रशासनाला दिले आहेत.


COMMENTS