PMC Deputy Commissioner Transfer | चार उपायुक्तांना अखेर केले कार्यमुक्त! | महापालिका आयुक्तांनी जारी केले आदेश
PMC Deputy Commissioner Transfer – (The Karbhari News Service) – राज्य शासनाकडून पुणे महापालिकेतील चार उपायुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये उपायुक्त चेतना केरुरे, आशा राऊत आणि संतोष वारुळे, प्रसाद काटकर यांचा समावेश होता. मागील गुरुवारी म्हणजे 21 मार्च हे आदेश आले होते. मात्र तरीही हे अधिकारी पालिकेत होते. अखेर महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांनी या चौघांना कार्यमुक्त केले आहे. (Pune Municipal Corporation (PMC)
लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने महापालिका मधील आयुक्त आणि उपायुक्तांच्या बदल्यांचा धडाका लावला आहे. नुकतेच पुणे महापालिकेतील आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या. उपायुक्तांच्या देखील बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर अजून काही उपायुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
मागील आठवड्यात सरकारने चार उपायुक्तांच्या बदल्या केल्या आहेत. यातील तीन अधिकारी हे महापालिकेत प्रतिनियुक्तीने आले होते. यामध्ये उपायुक्त चेतना केरुरे, आशा राऊत, प्रसाद काटकर आणि संतोष वारुळे यांचा समावेश आहे. दरम्यान या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या; मात्र त्यांची अजून पदस्थापना केलेली नव्हती. याबाबत स्वतंत्रपणे आदेश जारी केले जाणार आहेत. असे सरकार कडून सांगण्यात आले होते.
सरकारने आदेशात असे म्हटले होते कि अधिकाऱ्यांनी तात्काळ कार्यमुक्त व्हावे, मात्र कालपर्यंत हे अधिकारी महापालिकेत काम करत होते. अखेर महापालिका आयुक्तांनी या चौघांना काल दुपारी कार्यमुक्त केले आहे. दरम्यान आता रिक्त झालेल्या पदांवर कुणाची नेमणूक केली जाणार, याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे.