PMC Deputy Commissioner | पुणे महापालिकेच्या उपायुक्तांना रात्रीची ड्युटी 31 ऑगस्ट पर्यंत करावी लागणार    | महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांचे आदेश

HomeपुणेBreaking News

PMC Deputy Commissioner | पुणे महापालिकेच्या उपायुक्तांना रात्रीची ड्युटी 31 ऑगस्ट पर्यंत करावी लागणार | महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांचे आदेश

गणेश मुळे Jul 11, 2024 5:18 AM

Dr Rajendra Bhosale IAS | महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांची पाणी शिरलेल्या भागात भेट
Why are you working till the midnight of 13th April to prepare for Ambedkar Jayanti? | Pune Municipal Commissioner’s question to the officials
Pune PMC Officers | संदीप खलाटे यांचे पुनर्वसन; तर एका प्रशासन अधिकाऱ्याला सहाय्यक आयुक्त पदाचा दर्जा! | महापालिका आयुक्तांच्या निर्णयाने कर्मचारी वर्गाला दिलासा

PMC Deputy Commissioner | पुणे महापालिकेच्या उपायुक्तांना रात्रीची ड्युटी 31 ऑगस्ट पर्यंत करावी लागणार

| महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांचे आदेश

PMC Deputy Commissioner Duty – (The Karbhari News Service) – पावसाळ्यात उद्भवणाऱ्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि नागरिकांना मदत करण्यासाठी आता उपायुक्तांना सतर्क राहावे लागणार आहे. त्यासाठी उपायुक्तांना रात्रीची ड्युटी करावी लागणार आहे.  पुणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षात 7  “उप आयुक्त” यांना रात्री 8 ते सकाळी 8 असे  काम करावे लागणार आहे. दरम्यान 11 जुलै पर्यंत दिलेला हा कालावधी वाढवून आता 31 ऑगस्ट करण्यात आला आहे. महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले  (Dr Rajendra Bhosale IAS) यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. (Pune Municipal Corporation (PMC)
पुणे शहरात पावसाळयादरम्यान अतिवृष्टी तसेच कमी कालावधीत जास्त पाउस झाल्याने रस्त्यावर पाणी साचणे, पाण्याचा निचरा लवकर न होणे, रहिवासी संकुलामध्ये पाणी शिरणे, वृक्ष उन्मळून पडणे, वृक्षांच्या फांद्या तुटणे इत्यादी परिस्थिती उदभवते. अशाप्रसंगी महानगरपालिकेच्या मलनिस्सारण विभाग, पथ विभाग, उद्यान विभाग, अग्निशमन विभाग, क्षेत्रिय कार्यालये इत्यादी विविध घटक अग्निशमन व मदत कार्यासाठी कार्यरत असतात. (Pune PMC News)
महानगरपालिकेच्या मध्यवर्ती नियंत्रण कक्षात नागरिकांकडून उदभवलेल्या परीस्थितीच्या अनुषंगाने माहिती प्राप्त होत असते. प्राप्त माहितीच्या अनुषंगाने तातडीने महानगरपालिकेच्या विविध विभागांना माहिती देऊन व समन्वय साधून मदत व बचावकार्य तातडीने करणे आवश्यक असते. प्रसंगानुरूप जिल्हाधिकारी कार्यालय, पाटबंधारे विभाग, म.रा.वि.वि.क.लि. इत्यादी विभागांशी समन्वय साधणे आवश्यक ठरते. यासाठी महानगरपालिकेच्या मध्यवर्ती नियंत्रण कक्षात वरिष्ठ अधिकारी विशेषत रात्रीच्या कालावधीत उपस्थित असणे आवश्यक आहे.

| या उपायुक्त यांच्या करण्यात आल्या आहेत नियुक्त्या

1.   राजू नंदकर – सोमवार
2.  संदीप कदम – मंगळवार
3. माधव जगताप – बुधवार
4. राहुल जगताप – गुरुवार
5. विजय लांडगे – शुक्रवार
6. नितीन उदास – शनिवार
7. युनूस पठाण – रविवार