PMC Deputy Commissioner | महापालिका उपायुक्तांच्या जबाबदाऱ्या वाढल्या! देण्यात आले अतिरिक्त पदभार

HomeBreaking Newsपुणे

PMC Deputy Commissioner | महापालिका उपायुक्तांच्या जबाबदाऱ्या वाढल्या! देण्यात आले अतिरिक्त पदभार

गणेश मुळे Mar 29, 2024 4:32 AM

Pune PMC Disaster Management | आपत्ती व्यवस्थापन करण्यासाठी पुणे महापालिका तयार करणार SOP | 2 हजार कर्मचाऱ्यांना दिले प्रशिक्षण
Pune Municipal Corporation (PMC) will prepare SOP for disaster management
DCM Ajit Pawar on Pune Rain | पावसामुळे दहावी-बारावीची परीक्षा न देऊ शकलेल्यांची स्वतंत्र परीक्षा घेणार | अजित पवार

PMC Deputy Commissioner | महापालिका उपायुक्तांच्या जबाबदाऱ्या वाढल्या! देण्यात आले अतिरिक्त पदभार

PMC Deputy Commissioner | पुणे | पुणे महापालिकेतील (Pune Municipal Corporation (PMC) 4 उपायुक्तांच्या बदल्या नुकत्याच करण्यात आल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) पार्श्वभूमीवर या बदल्या करण्यात आल्या आहेत. दरम्यान या जागा रिक्त झाल्या आहेत. तसेच त्यांच्याकडील पदभार देखील इतर अधिकाऱ्यांना द्यावे लागणार होते. त्यानुसार महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले (Dr Rajendra Bhosale IAS) यांनी सद्यस्थितीत काम करणाऱ्या उपायुक्त यांच्याकडे अतिरिक्त पदभार दिले आहेत. तसे आदेश जारी करण्यात आले आहेत. (Pune PMC News)
महापालिका आयुक्तांनी जारी केलेल्या आदेशानुसार उपायुक्त्त महेश पाटील यांच्याकडे निवडणूक विभाग, सोशल मीडिया कक्ष, सांस्कृतिक विभाग आणि माहिती व जनसंपर्क विभागाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. पाटील यांच्याकडे सद्यस्थितीत दक्षता विभाग, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि मालमत्ता व व्यवस्थापन विभागाचा पदभार आहे.
उपायुक्त जयंत भोसेकर यांच्याकडे परिमंडळ क्रमांक 4 ची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. भोसेकर यांच्याकडे सद्यस्थितीत मोटार वाहन विभाग आणि मागासवर्ग विभागाची जबाबदारी आहे.
उपायुक्त गणेश सोनुने यांच्याकडे परिमंडळ 2 ची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. सोनुने यांच्याकडे सद्यस्थितीत मध्यवर्ती भांडार विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचा पदभार आहे.
उपायुक्त संजय शिंदे यांच्याकडे परिमंडळ क्रमांक 3 ची जबाबदारी देण्यात आली आहे.