PMC Deputy Commissioner | उपायुक्त यांच्या कामकाज व्यवस्थेत महापालिका आयुक्तांकडून पुन्हा बदल | काही अधिकाऱ्यांवर विश्वास तर काहींचे विभाग काढून घेतले
Naval Kishore Ram IAS – (The Karbhari News Service) – महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी नुकतेच महापालिका उपायुक्त यांना विविध विभागाची जबाबदारी दिली होती. याबाबत काही आक्षेप देखील घेतले होते. दरम्यान महापालिका आयुक्तांनी आज पुन्हा उपायुक्त यांच्या कामकाज व्यवस्थेत बदल केला आहे. यात काही अधिकाऱ्यांवर विश्वास दाखवला आहे तर काही अधिकाऱ्या कडून विभाग काढून घेतले आहेत. (Pune Municipal Corporation – PMC)
महापालिका आयुक्त आणि उपायुक्त किशोरी शिंदे यांना १) परिमंडळ १ २) उपायुक्त प्रशासन अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय ) उप आयुक्त (विशेष) विभाग ४) मुद्रणालय विभाग याची जबाबदारी दिली होती. मात्र नवीन आदेशात त्यांच्याकडून [परिमंडळ १ ची जबाबदारी काढून घेण्यात आली आहे.
उपायुक्त रवि पवार यांच्याकडे १) कर आकारणी व कर संकलन विभाग २) महात्मा फुले वाडा आरक्षित क्षेत्राचे संपादनचे कामकाज ३) क्रीडा विभाग या विभागांची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र आता त्यांच्याकडे फक्त कर आकारणी व कर संकलन विभाग ची जबाबदारी देण्यात आली आहे.
उपायुक्त माधव जगताप यांच्याकडील काही विभाग काढून घेत त्यांच्याकडे १) आकाशचिन्ह व परवाना विभाग २) अग्निशमन विभाग ची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र आता त्यांची जबाबदारी वाढवून त्यांच्याकडे आकाशचिन्ह व परवाना विभाग, परिमंडळ १, महात्मा फुले वाडा आरक्षित क्षेत्राचे संपादनचे कामकाज आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग देण्यात आला आहे.
उपायुक्त संतोष वारुळे यांच्याकडे १) परिमंडळ क्र. २ विभाग २) सांस्कृतिक केंद्र विभाग ची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र नवीन आदेशानुसार वारुळे यांच्याकडे फक्त परिमंडळ २ ची जबाबदारी असेल.
उपायुक्त अरविंद माळी यांच्याकडे १) परिमंडळ क्र. ४ विभाग २) आपत्ती व्यवस्थापन विभाग ची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र त्यांच्याकडून आपत्ती व्यवस्थापन विभाग काढून घेत त्यांना मध्यवर्ती भांडार विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.
उपायुक्त आशा राऊत यांच्याकडे १) मध्यवर्ती भांडार विभाग २) सुरक्षा विभाग सनियंत्रण ची जबाबदारी देण्यात आली होती. आता नवीन आदेशानुसार त्यांच्याकडे त्यांच्याकडील भांडार विभाग काढून घेत सांस्कृतिक केंद्र आणि क्रीडा विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.

COMMENTS