PMC Deputy Commissioner | इब्राहिम चौधरी यांची पुणे महापालिकेत प्रति नियुक्तीने उपायुक्त पदी नियुक्ती! | निवडणूक आयोगाच्या आदेशाने कुणाची बदली होणार?
| ३ वर्षाच्या नियुक्तीचे राज्य सरकार कडून आदेश जारी
Pune Municipal Corporation – PMC – (The Karbhari News Service) पुणे महापालिकेत (Pune PMC) नुकतेच ४ उपायुक्त यांची प्रति नियुक्तीने नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर अजून एक उपायुक्त पुणे महापालिकेला मिळाला आहे. राज्य सरकार कडून याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत. (Pune PMC News)
उपजिल्हाधिकारी पदावरील इब्राहिम चौधरी यांना पुणे महापालिकेत तीन वर्षासाठी उपायुक्त पदी नियुक्त करण्यात आले आहे. या आधी शासनाकडून ४ अधिकारी महापालिकेत प्रति नियुक्तीने नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांना अजून कुठले खाते देण्यात आलेले नाही. चर्चा अशी आहे कि महापालिकेतील महत्त्वाची आणि मलाईदार खाती या अधिकाऱ्यांना हवी आहेत. त्यामुळे हे अधिकारी आपली फिल्डिंग लावून आहेत. मात्र यामुळे आयुक्तांना अजून कुठला निर्णय घेता आलेला नाही.
– निवडणूक आयोगाच्या आदेशाने कुणाची बदली होणार?
दरम्यान महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. या पार्श्वभूमी वर काही अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येणार आहेत. निवडणूक आयोगाने याबाबतचे आदेश जारी केले आहेत. आयोगाने म्हटले आहे कि ज्या अधिकाऱ्याना एका ठिकाणी ३० सप्टेंबर पूर्वी ३ वर्ष पूर्ण होत आहेत. या अधिकाऱ्यांचा निवडणुकी वर प्रभाव होऊ नये म्हणून त्यांची बदली करावी. त्यानुसार काही अधिकाऱ्यांचा कालावधी सप्टेंबर पूर्वी पूर्ण होत आहे. त्यांची बदली करावी लागणार आहे. दरम्यान याबाबत प्रशासनाला विचारले असता सांगण्यात आले की याबाबतची तपासणी सुरू आहे. आम्ही फक्त सरकारला याची माहिती देणार आहोत. बदली करण्याचा अधिकार सरकाराचा आहे.
—-
निवडणूक आयोगाचे आदेश आम्हाला नुकतेच प्राप्त झाले आहेत. या आदेशानुसार कुणाची बदली होईल, त्याची तपासणी आम्ही करत आहोत. त्यानंतर आम्ही याची माहिती सरकारला पाठवू.
– डॉ राजेंद्र भोसले, आयुक्त.