PMC Deputy Commissioner  | आशा राऊत, चेतना केरुरे यांची पुन्हा पुणे महापालिकेच्या उपायुक्त पदी नियुक्ती! |  राज्य सरकार कडून जारी केले गेले आदेश

HomeBreaking Newsपुणे

PMC Deputy Commissioner | आशा राऊत, चेतना केरुरे यांची पुन्हा पुणे महापालिकेच्या उपायुक्त पदी नियुक्ती! | राज्य सरकार कडून जारी केले गेले आदेश

गणेश मुळे Jul 22, 2024 8:40 AM

PMC Deputy commissioner | उपायुक्त आशा राऊत आणि प्रतिभा पाटील यांना पुणे महापालिकेत 1 वर्ष मुदतवाढ!   | राज्य सरकारकडून आदेश जारी 
PMC Primary Education Department | पुणे महापालिकेच्या शाळेतील १० शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार!
PMC Deputy Commissioner | पुणे महापालिकेत शासनाकडील अजून २ नवीन उपायुक्त | राज्य सरकारकडून आदेश जारी

PMC Deputy Commissioner  | आशा राऊत, चेतना केरुरे यांची पुन्हा पुणे महापालिकेच्या उपायुक्त पदी नियुक्ती! |  राज्य सरकार कडून जारी केले गेले आदेश

PMC Deputy Commissioner Transfer – (The Karbhari News Service) – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून पुणे महापालिकेतील चार उपायुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये उपायुक्त चेतना केरुरे, आशा राऊत आणि संतोष वारुळे, प्रसाद काटकर यांचा समावेश होता दरम्यान आता चेतना केरूरे आणि आशा राऊत यांना पुन्हा एकदा महापालिकेच्या उपायुक्त पदावर नियुक्ती देण्यात आली आहे. राज्य सरकारकडून याबाबतचे आदेश नुकतेच जारी करण्यात आले आहेत.  (Pune Municipal Corporation (PMC)
लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने महापालिका मधील आयुक्त आणि उपायुक्तांच्या बदल्यांचा धडाका लावला होता.  त्याआधी पुणे महापालिकेतील आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर उपायुक्तांच्या देखील बदल्या करण्यात आल्या होत्या. यामध्ये चेतना केरुरे आणि आशा राऊत यांचा समावेश होता. (Pune PMC News)

मॅट मध्ये केले होते अपील

दरम्यान राऊत आणि केरुरे यांची बदली केली होती तरी त्यांना नियुक्तीच्या प्रतिक्षेत ठेवले होते. कारण आपला पुणे महापालिकेत उपायुक्त या पदावर तीन वर्षांचा कालावधी पूर्ण झाला नाही, तरी बदली करण्यात आली, या शासनाच्या निर्णया विरोधात आशा राऊत आणि चेतना केरूरे यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (Maharashtra Administrative Tribunal- MAT) मध्ये अपील केले होते. नुकतेच न्यायाधिकरणाने याबाबत आदेश जारी करत राऊत आणि केरूरे यांच्या बाजूने निर्णय दिला होता. तसेच सरकारला याबाबत आदेश दिले होते.  त्यानुसार सरकारने राऊत आणि केरुरे यांची पुणे महापालिकेत उपायुक्त पदी नियुक्ती केली आहे. आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारून अहवाल देण्याचे आदेश शासनाचे अवर सचिव अ. का. लक्कस यांनी जारी केले आहेत.