PMC DBT 10th 12th Scholarship : 10 वी आणि 12 वी च्या 1664 विद्यार्थ्यांच्या खात्यात स्कॉलरशिप ची रक्कम जमा
| आगामी दोन दिवसात अजून 5 विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होणार रक्कम
पुणे | (The Karbhari Online) – पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) हद्दीत राहणाऱ्या १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद शैक्षणिक अर्थसाहाय्य योजनेअंतर्गत (Maulana Abul Kalam Azad Scholarship) आणि १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शैक्षणिक अर्थसाहाय्य योजनेअंतर्गत (Annabhau Sathe Scholarship) पुढील शिक्षणासाठी अर्थसाहाय्य देण्याची योजना कार्यान्वित आहे. यावर्षीची प्रक्रिया समाज विकास विभागाने पूर्ण केली आहे. शिवाय विद्यार्थ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत 1664 विद्यार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आली आहे. अशी माहिती समाज विकास विभागाच्या (PMC SDD) वतीने देण्यात आली. (Pune Corporation Scholarship)
पुणे महानगरपालिकेने अर्थसंकल्पातील वरील योजनेसाठी तरतूद केलेल्या रकमेतून समान रक्कम किंवा इ. १० वी करिता रक्कम रु. १५०००/- व इ. १२ वी करिता रक्कम रु. २५०००/- अर्थसाहाय्य देण्याची योजना आहे. या योजना अंतर्गत महापालिकेने पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज मागवले होते. याचा कालावधी 29 डिसेंबर ला समाप्त झाला होता. या कालावधीत महापालिकेकडे 10841 अर्ज प्राप्त झाले होते. त्यांनतर 10 दिवस कालावधी वाढवून देण्यात आला होता. यात अजून अर्जाची वाढ झाली. याची चाळणी केल्यानंतर जवळपास 9 हजार अर्ज पात्र झाले. अशी माहिती समाज विकास विभागाच्या (PMC Social Devlopment Department) वतीने देण्यात आली. (Pune Municipal Corporation scholarship Scheme)
प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले कि आतापर्यंत 1664 विद्यार्थ्यांच्या खात्यावर स्कॉलरशिप ची रक्कम जमा करण्यात आली आहे. आगामी दोन दिवसांत अजून 5 हजार विद्यार्थ्यांच्या खात्यावर रक्कम जमा केली जाणार आहे. तर उर्वरीत विद्यार्थ्यांची बिले लेखा विभागाकडे तपासणी साठी पाठविली आहेत. असे विभागाकडून सांगण्यात आले.