PMC Cultural Centre Department | महापालिकेच्या १५ नाट्यगृहाची माहिती आता एका क्लिकवर!
| रंगयात्रा मोबाईल एप च्या माध्यमातून करता येणार ऑनलाइन बुकिंग
Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेच्या अमृत महोत्सवानिमित्त ७५ व्या वर्धापनदिनी (PMC 75th Anniversary) सांस्कृतिक केंद्रे विभागाच्या (PMC Cultural Centre Department) सर्व सांस्कृतिक केंद्रांमधील ऑनलाईन बुकिंग करणेकरिता “रंगयात्रा” या मोबाईल अॅप्लिकेशन (Rangyatra Mobile App) चे अनावरण पार पडले. त्यानुसार आता रंगयात्रा मोबाईल एप च्या माध्यमातून ऑनलाइन बुकिंग करता येणार आहे. शिवाय महापालिकेच्या १५ नाट्यगृहाची माहिती आता एका क्लिकवर मिळणार आहे. (Pune Municipal Corporation – PMC)
सद्यस्थितीत सांस्कृतिक केंद्रे विभागाकडील प्रशासकीय कामकाज हस्तलिखित स्वरुपात सुरु आहे. जसे की, नाट्यगृहांचे चौमाही आरक्षणासाठी हस्तलिखित अर्ज स्वीकारून तारखांचे वाटप करणे, नाट्यगृह भाडे रोख / डीडीने स्वीकारणे, आणि त्याची पावती किंवा चलन करणे, इत्यादी. नवीन विकसित केलेल्या मोबाईल अॅपद्वारे सांस्कृतिक केंद्रे विभागाकडील वरील सर्व कामकाज ऑनलाइन पद्धतीने संगणक प्रणालीमधून केले जाणार आहे. सदर संगणक प्रणालीद्वारे संपूर्ण महाराष्ट्रातील कोणत्याही नागरिकाला, नाट्य आयोजक, लावणी आयोजक, इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक संस्था यांना सर्व १५ नाट्यगृहांची सर्व माहिती, आसनक्षमता, सोयीसुविधा, उपलब्धता, पत्ता, इत्यादी माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. नाट्यगृहांची उपलब्धता तपासता येणार आहे.
घरबसल्या कुठूनही आरक्षण अर्ज करता येणार आहे. नाट्यगृह भाडे ऑनलाईन पेमेंट पद्धतीने घर बसल्या भरता येणार आहे. सदर ऑनलाइन संगणक प्रणाली व मोबाईल अॅपमुळे सर्व नाट्यगृहांमध्ये कार्यक्रमाकरिता नाट्यगृह आरक्षित करण्याचे कामकाजा मध्ये अधिक पारदर्शकता येणार आहे.
सर्व गोष्टी एका क्लिकवर नागरीकांना एका क्लिकवर उपलब्ध व्हाव्यात, याकरिता सांस्कृतिक केंद्रे विभागाद्वारे “रंगयात्रा” हे मोबाईल अॅप्लिकेशन विकसित करण्यात आले आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील नाट्य आयोजक, लावणी आयोजक, इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक संस्था व सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की ‘दि. १ मे २०२५ ते दि. ३१ ऑगस्ट २०२५’ या कालावधीतील आपल्या नियोजित कार्यक्रमाकरिता दि. १५ मार्च २०२५ ते दि. २५ मार्च २०२५ या कालावधीमध्ये “रंगयात्रा” या मोबाईल अॅप्लिकेशनद्वारे नाट्यगृह आरक्षणाकरिता अर्ज सादर करावेत. दि. १० एप्रिल २०२५ रोजी ज्या संस्थेस आरक्षण भेटले आहे, त्यांना आपण अर्ज करतेवेळेस दिलेल्या मोबाईल क्रमांक व इमेल आयडी द्वारे कळविण्यात येईल.
सदर “रंगयात्रा” अॅप कसे वापरायचे याबाबतचा व्हिडीओ अॅपमध्ये आहे. तसेच अॅप बाबत काही अडचण असल्यास पुणे महानगरपालिकेच्या सांस्कृतिक केंद्रे विभागाच्या अखत्यारीतील बालगंधर्व रंगमंदिर, श्री गणेश कला क्रीडा मंच – स्वारगेट आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक – बिबवेवाडी येथे हेल्पडेस्क (Helpdesk ) / मदतकक्ष उभारणेत आले आहेत. त्या ठिकाणीही सदर मोबाईल अॅपबाबत माहिती देण्याकरिता सांस्कृतिक केंद्रे विभागाचे अधिकारी यांची नेमणूक करणेत आलेली आहे.
तसेच सदर मोबाईल अॅप तयार करणारे संगणक अभियंता श्री. प्रसाद निकुंभ भ्रमणध्वनी क्रमांक ९९७५१७२२६६ यांनाही संपर्क करू शकतात. मोबाईल अॅप्लिकेशन – ‘रंगयात्रा’ हे गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल स्टोअर या दोन्हीही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.
COMMENTS