PMC Contract Employees Diwali Bonus | पुणे मनपाच्या कंत्राटी कामगारांना दिवाळी बोनस देण्याबाबत महापालिका आयुक्त सकारात्मक!

Homeadministrative

PMC Contract Employees Diwali Bonus | पुणे मनपाच्या कंत्राटी कामगारांना दिवाळी बोनस देण्याबाबत महापालिका आयुक्त सकारात्मक!

Ganesh Kumar Mule Aug 20, 2025 10:32 AM

Paud Phata Balbharati Road | पौड फाटा – बालभारती रस्ता आता विलंब न करता लवकरात लवकर सुरु करा | माजी नगरसेवकांची महापालिका आयुक्तांकडे मागणी 
Good News for PMC Employees | कामावर असताना मृत्यू झाल्यास कर्मचाऱ्यांच्या वारसांना दिले जाणार ५ लाख! | कामगार कल्याण विभागाच्या प्रस्तावाला धोरणात्मक मान्यता
79th Independence Day in PMC | पुणे महानगरपालिकेत भारताचा ७९ वा स्वातंत्र्य दिन समारंभ संपन्न

PMC Contract Employees Diwali Bonus | पुणे मनपाच्या कंत्राटी कामगारांना दिवाळी बोनस देण्याबाबत महापालिका आयुक्त सकारात्मक!

 

Pune PMC News – (The Karbhari News Service)  – यंदाची दिवाळी ही पुणे महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांची खास होणार आहे. कारण कंत्राटी कामगारांना बोनस देण्याबाबत महापालिका आयुक्त नवल किशोर राम (Naval Kihsore Ram IAS)  यांनी  सकारात्मक भूमिका घेतली आहे. कामगार कल्याण विभागाकडून याबाबत प्रस्ताव ठेवण्यात आला होता. अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.  (Pune Municipal Corporation -PMC)

पुणे महानगरपालिकेमध्ये सुमारे साडेदहा हजार कंत्राटी कामगार विविध खात्यांमध्ये अनेक वर्षांपासून काम करीत आहेत. या सर्व कामगारांना बोनस ऍक्ट प्रमाणे बोनस मिळावा, पगारी रजा मिळाव्यात,15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 1 मे आणि 2 ऑक्टोबर या राष्ट्रीय सणांच्या सुट्ट्या कायद्याप्रमाणे याचा लाभ मिळावा अशा मागण्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होत्या. पुणे महापालिका कामगार युनियन (मान्यताप्राप्त) आणि सुनील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करणारी राष्ट्रीय मजदूर संघटना आणि विविध कर्मचारी संघटना यांच्या याबाबत मागण्या होत्या. या मागणी नुसार महापालिका कामगार विभागाने दिवाळी बोनस देण्याबाबत प्रस्ताव महापालिका आयुक्त यांच्यासमोर ठेवला होता. त्यानुसार महापालिका आयुक्त यांनी प्रशासन आणि संघटना यांच्यासोबत बैठक घेतली.

बैठकीत दिवाळी बोनस, रजा वेतन आणि घर भाडे देण्याबाबत आयुक्तांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यामुळे कंत्राटी कर्मचारी यांना या दिवाळीला बोनस गिफ्ट मिळू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या काही वर्षापासून याबाबत निर्णय होत नव्हता. मात्र आयुक्त नवल किशोर राम यांनी याबाबत पुढाकार घेत कंत्राटी कामगारांना खुश केले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0