PMC Contract Employees | पुणे महानगरपालिकेच्या जागरूकतेमुळे अपघाती निधन झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्याच्या वारसास १० लाख  विम्याची रक्कम प्राप्त

Homeadministrative

PMC Contract Employees | पुणे महानगरपालिकेच्या जागरूकतेमुळे अपघाती निधन झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्याच्या वारसास १० लाख  विम्याची रक्कम प्राप्त

Ganesh Kumar Mule Jan 21, 2026 5:51 PM

Swachh Survekshan Award | स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार क्रमवारीत पुण्याला देशात पहिल्या पाचमध्ये आणण्यासाठी नागरिकांनी योगदान द्यावे | पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील
Pune PMC News | अतिरिक्त आयुक्त यांच्याकडून अस्तित्वातील व नियोजीत रस्त्यांची जागा पाहणी 
Datta Bahirat Patil | आशानगर पाण्याच्या टाकीचे उदघाटन कॉंग्रेस करणार | श्रेय उपटण्याची भाजपची संतापजनक धडपड | माजी नगरसेवक दत्ता बहिरट

PMC Contract Employees | पुणे महानगरपालिकेच्या जागरूकतेमुळे अपघाती निधन झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्याच्या वारसास १० लाख  विम्याची रक्कम प्राप्त

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – सिद्धीविनायक एन्टरप्रायजेस या पुणे महानगरपालिकेस कंत्राटी कामगार सेवा पुरविणाऱ्या संस्थेकडील कंत्राटी कामगार कै.निवांत दशरथ औसरे यांचे त्यांचे गावी जात असताना अपघात होवून निधन झाले.  कामगारास वैयक्तिक अपघात विम्याचे सुरक्षा कवच असल्याने पुणे महानगरपालिका व ठेकेदार संस्था यांच्या प्रयत्नाने त्यांचे पात्र वारसासाठी विमा क्लेम मान्य करून घेण्यात आला. दिवंगत कामगाराच्या वारसास १० लक्ष विम्याचा धनादेश पवनीत कौर (भा.प्र.से.), अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज.) यांचे हस्ते दिवंगत कामगाराची पत्नी  साक्षी निवांत औसरे यांना आज  रोजी देण्यात आला. अशी माहिती मुख्य कामगार अधिकारी नितीन केंजळे यांनी दिली.

यावेळी मुख्य कामगार अधिकारी नितीन केंजळे, उप कामगार अधिकारी बुगप्पा कोळी, ठेकेदार संस्थेचे प्रोप्रायटर दादासाहेब झेंडे तसेच दिवंगत कामगाराची पत्नी  साक्षी निवांत औसरे व वडील उपस्थित होते.

पुणे महानगरपालिकेतील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी २५ लाखाचा वैयक्तिक अपघात विमा उतरविण्यात आला आहे. याच धर्तीवर पुणे मनपातील कंत्राटी कामगारांसाठी वैयक्तिक अपघात विमा उतरविणेबाबत मुख्य कामगार अधिकारी नितीन केंजळे यांनी विमा कंपनीस विनंती केली होती. त्यास अनुसरून न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या शासकीय विमा कंपनीने २७०/- एवढ्या अत्यल्प रकमेमध्ये कंत्राटी कामगारांसाठी १० लाखाचा वैयक्तिक अपघाती विमा देण्याचा प्रस्ताव सादर केला होता.

प्रस्तावानुसार पुणे महानगरपालिकेतील कंत्राटी मनुष्यबळ पुरविणाऱ्या सर्व ठेकेदारांची बैठक बोलावून त्यांच्याकडील कंत्राटी कामगारांचा वैयक्तिक अपघात विमा काढण्याबाबतचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार अनेक ठेकेदारांनी आपल्याकडील कंत्राटी कामगारांचा वैयक्तिक अपघात विमा उतरविला आहे.

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: