PMC Computer Operator Promotion | संगणक ऑपरेटर पदोन्नती : सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध
| आक्षेप नोंदवण्यासाठी 15 दिवसांची मुदत
PMC Computer Operator Promotion – (The Karbhari News Service) पुणे महापालिकेत (Pune Municipal Corporation -PMC) कर्मचाऱ्यांना संगणक ऑपरेटर पदासाठी पदोन्नती (Computer Operator Promotion) देण्यात येणार आहे. त्यासाठी पात्र कर्मचाऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन सामान्य प्रशासन विभागाने होते. हे पद तांत्रिक सेवा श्रेणी 3 मधील आहे. अर्जानुसार सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यात काही आक्षेप असतील तर ते नोंदवण्यासाठी कर्मचाऱ्यांना 15 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. (PMC IT Department)
पुणे महानगरपालिका (PMC Pune) प्रशासनाकडील माहिती व तंत्रज्ञान विभागाकडील “संगणक ऑपरेटर” या पदाच्या एकूण संख्येच्या ५०% जागा पुणे महानगरपालिकेमधील कार्यरत कर्मचा-यांमधून (Pune Municipal Corporation Employees) सेवाज्येष्ठता वगुणवत्ता या आधारे कर्मचा-यांमधून भरल्या जातात. शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील सेवाज्येष्ठता व गुणवत्ता या आधारे कार्यरत कर्मचाऱ्यामधून किमान ०३ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक. अशी पदोन्नतीची पात्रता आहे. तसेच यासाठी संगणक किंवा माहिती तंत्रज्ञान विषयातील पदवी किंवा पदविका असणे आवश्यक आहे. (PMC Pune Employees Promotion)
त्यानुसार “संगणक ऑपरेटर” या पदाकरिता सेवकांकडून अर्ज मागविण्यात आले होते. प्राप्त झालेल्या अर्जांमधील तपशीलानुसार पात्र/अपात्र सेवकांची तयार करण्यात आलेली सेवाज्येष्ठता यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. सेवाज्येष्ठता यादी पुणे महानगरपालिकेच्या www.punecorporation.org या संकेतस्थळावरील परिपत्रक प्रणाली (Circular System) वर प्रसिध्द करण्यात आली आहे.
सेवाज्येष्ठता यादीतील सेवक / कर्मचारी यांनी स्वतःचे नाव, जात, जातीचा गट, शैक्षणिक पात्रता, जन्मदिनांक, नेमणूकीचे दिनांक इ. सर्व बाबींची पाहणी करुन आपल्या नावांसमोर स्वाक्षरी करावी. असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे . सदर पात्र/अपात्र सेवाज्येष्ठता यादीमध्ये घेण्यात आलेल्या नोंदीबाबत काही आक्षेप / चुका असल्यास कार्यालय परिपत्रक प्रसिध्द झाल्याचे दिनांकापासून १५ दिवसाचे मुदतीत आपले आक्षेप लेखी स्वरुपात कागदपत्रांच्या पुराव्यासहीत आस्थापना विभाग, रुम नं. २४०, पुणे महानगरपालिका, मुख्य इमारत येथे कार्यालयीन वेळेत सादर करावे.
त्यानुसार पुढील १५ दिवसांत सदरच्या नोंदी घेवून अंतिम पात्र सेवकांची सेवाजेष्ठता सूचीस मान्यता घेवून ती प्रसिध्द करण्यात येईल. तसेच मुदतीनंतर आलेल्या आक्षेपांचा किंवा अंतिम पात्र सेवकांची सेवाजेष्ठता यादी प्रसिध्द केल्यानंतर त्यामध्ये दुरुस्त्या सुचविण्यात आल्यास त्यांची दखल घेतली जाणार नाही. संबंधित सेवक/कर्मचारी यांचे शैक्षणिक अर्हतेच्या कागदपत्राबाबत तक्रार आल्यास व त्यामध्ये तथ्य आढळल्यास संबंधित सेवक / कर्मचारी यांची नेमणूक कोणत्याही टप्प्यावर संपुष्टात आणणेबाबत अलहिदा निर्णय घेण्यात येईल. असे सामान्य प्रशासन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
—-