PMC Commissioner Naval Kishore Ram | महापलिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी दाखवली एकजूट | आयुक्त राम यांच्या समर्थनार्थ काळ्या फिती लावून निषेध आंदोलन
Pune PMC News – (The Karbhari News Service) – महापालिका कर्मचारी आणि अधिकारी हे आयुक्त नवल किशोर राम यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहताना दिसले. महापालिका आयुक्त यांना मनसे कडून अरेरावी ची भाषा केल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या मनात संताप होता. त्यानुसार सर्व कर्मचारी आणि अधिकारी यांनी एकजूट होत आयुक्त नवल किशोर राम यांच्या समर्थनार्थ काळ्या फिती लावून निषेध आंदोलन केले. तसेच मनपा भवनात एक सभा देखील घेण्यात आली. यात सर्व अधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्त यांच्या भूमिकेचे स्वागत केले. (Pune Municipal Corporation – PMC)
महापालिका आयुक्त बंगल्यातील गायब झालेल्या साहित्य प्रकरण वरून मनसे नेते किशोर शिंदे आणि काही कार्यकर्ते महापालिका आयुक्त यांना भेटायला गेले होते. मात्र आयुक्त यांनी विभाग प्रमुख यांच्या सोबत बैठक ठेवली होती. त्यात ते व्यस्त होते. त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी बैठकीत जात गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. मनसे ची ही भूमिका महापालिका आयुक्त यांना रुचली नाही. त्यामुळे मग आयुक्त आणि मनसे नेते किशोर शिंदे यांच्या शाब्दिक चकमक झाली. शिवाय मनसे कार्यकर्त्यांनी नंतर आयुक्त यांच्या दालना बाहेर ठिय्या देखील मांडला. याबाबत महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. आयुक्तांनी मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्याची भूमिका घेतली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान या प्रकरणा वरून महापालिका कर्मचारी आणि अधिकारी यांनी एकत्र येत आयुक्त राम यांच्या भूमिकेचे स्वागत केले. तसेच कुठल्याही लोकप्रतिनिधी ने आयुक्त यांच्याशी असे असभ्य वागणे योग्य नाही, असा संदेश दिला. कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी आज दिवसभर काळ्या फिती लावून आंदोलन केले. तसेच मनपा भवनातील हिरवळीवर एक सभा घेण्यात आली. यात सर्वांनी आपल्या भूमिका मांडल्या. यावेळी महापालिका कामगार युनियन देखील सहभागी झाली होती. यावेळी अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी पी, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर, उपायुक्त माधव जगताप यांच्यासहित महापालिका अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते.

COMMENTS