PMC City Engineer | कोंढवा परिसरात अनाधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी ४० अभियंत्यांची विशेष नियुक्ती | आजच्या कारवाईत ३८०० चौरस फुट बांधकामावर कारवाई 

Homeadministrative

PMC City Engineer | कोंढवा परिसरात अनाधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी ४० अभियंत्यांची विशेष नियुक्ती | आजच्या कारवाईत ३८०० चौरस फुट बांधकामावर कारवाई 

Ganesh Kumar Mule Jul 30, 2025 10:10 PM

Pune Corporation Encroachment Action | पुणे महापालिकेची पाषाण परिसरात जोरदार अतिक्रमण कारवाई | 3 लाख चौरस फुट बांधकाम पाडले
Pune Airport Runway | पुणे विमानतळ धावपट्टी विस्तारीकरणाचे काम आता ‘फास्टट्रॅक’वर : केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ
PMC IWMS | महापालिकेच्या कामाच्या एस्टीमेटपासून ते कामाचे बिल अदा करण्यापर्यंतची सर्व कामे पेपरलेस होणार | शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांची माहिती

PMC City Engineer | कोंढवा परिसरात अनाधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी ४० अभियंत्यांची विशेष नियुक्ती | आजच्या कारवाईत ३८०० चौरस फुट बांधकामावर कारवाई

Pune PMC News – (The Karbhari News Service) – कोंढवा परिसरातील वाढत्या अनाधिकृत बांधकामाच्या अनुषंगाने शहर अभियंता यांच्या आदेशानुसार कोंढवा परिसरात अनाधिकृत बांधकामावर सातत्याने कारवाई करणे, MRTP act अनुसार गुन्हे दाखल करणे ई. कामासाठी सुमारे 40 अभियंता यांची विशेष नियुक्ती केली आहे.

या  आदेशानुसार आज कोंढवा येथील मलिक नगर, s.no 46 पै. चार मजल्याचे आर सी सी बांधकाम व साई बाबा नगर S.no 62 पै येथील तीन मजल्याचे आर सी सी बांधकाम असे सुमारे 3800 square feet. बांधकामावर कारवाई झालेली आहे. (Pune Municipal Corporation – PMC)

त्यामुळे सदर अनधिकृत बांधकाम हे कारवाई झाल्यामुळे धोकादायक झालेले आहे.त्याचा वापर करण्यात येऊ नये व सदर इमारतीत सदनिका विकत घेऊ नये.असे आवाहन पुणे महानगरपालिका तर्फे करण्यात आले आहे. शहर अभियंता प्रशांत वाघमारे व अधीक्षक अभियंता राजेश बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.