PMC CIIIT Project |  उशीर झाल्याने 225 कोटींचा कौशल्यवर्धन केंद्र उभारण्याचा प्रस्ताव झाला 279 कोटींचा | महापालिकेला द्यावे लागणार 50 कोटी

HomeBreaking Newsपुणे

PMC CIIIT Project | उशीर झाल्याने 225 कोटींचा कौशल्यवर्धन केंद्र उभारण्याचा प्रस्ताव झाला 279 कोटींचा | महापालिकेला द्यावे लागणार 50 कोटी

गणेश मुळे Jul 03, 2024 5:27 AM

PMC Fireman Bharti Results | फायरमन पद निकाल बाबत निवड समितीची बैठक 9 फेब्रुवारीला!
PMC Deputy Commissioner | पुणे महापालिकेत अजून एक उपायुक्त प्रतिनियुक्तीने! | राज्य सरकारकडून आदेश जारी
Pune Rain | PMC Deputy Commissioner | शासनाकडील अनुभवी उपयुक्तांना दिली जावी महापूरात सापडलेल्या विस्थापितांची जबाबदारी! | विविध क्षेत्रातून मागणी

PMC CIIIT Project |  उशीर झाल्याने 225 कोटींचा कौशल्यवर्धन केंद्र उभारण्याचा प्रस्ताव झाला 279 कोटींचा | महापालिकेला द्यावे लागणार 50 कोटी

| स्थायी समितीची खर्च करण्याला मान्यता

PMC CIIIT project- (The Karbhari News Service) पुणे शहरात खाजगी सहभागातून कौशल्यवर्धन केंद्र (Centre for Invention, Innovation, Incubation and Training Centre (CIIIT) उभारण्यात येणार आहे. त्यासाठी टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेड सोबत सामंजस्य करार केला जाणार आहे. मात्र हा प्रकल्प करण्यास विलंब झाल्याने प्रकल्पाची 225 कोटींची किंमत वाढून ती 279 कोटी झाली आहे. पूर्वी महापालिकेला 43 कोटी द्यावे लागणार होते. मात्र आता 50 कोटी द्यावे लागणार आहेत. याबाबतच्या प्रस्तावाला नुकतीच स्थायी समितीच्या बैठकीत (PMC Standing Committee) मान्यता देण्यात आली आहे. (Pune Municipal Corporation (PMC)
प्रकल्पाच्या आराखड्याचे तांत्रिक आणि आर्थिक विश्लेषण COEP या संस्थेकडून करून घेणेत ऑर.  COEP Technological University, पुणे यांचा अहवाल तयार करण्यासाठी केलेल्या मागणीनुसार र.रु.१९,९९,९२३/- (अक्षरी- एकोणीस लाख नव्याण्णव हजार नऊशे तेवीस फक्त) इतकी रकम शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे (CEOP) यांना अदा करण्यात आली.

माहिती व तंत्रज्ञान विभागामार्फत कळविण्यात आल्यानुसार COEP टेक्नॉलॉजीकल युनिव्हर्सिटी यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. सदरच्या अहवालानुसार सीओईपी टेक्नॉलॉजीकल युनिव्हर्सिटी यांनी सदर प्रशिक्षणाचा कालावधी ६० महिने करणेबाबत शिफारस/सूचना केली आहे. तसेच सदर केंद्राच्या सुरळीत आणि प्रभावी कामकाजासाठी पहिली पाच वर्षांची मुदत टाटा टेक्नॉलॉजीच्या टीमने चालवली पाहिजे. तसेच प्रकल्प ५ वर्षांपैकी मूळ प्रस्तावानुसार सदर प्रकल्पाचा पहिल्या २ वर्ष प्रशिक्षणाचा कालावधीसोडून उर्वरीत पुढील ३ वर्षासाठी लागणारा प्रशिक्षणाचा अतिरिक्त खर्च र.रु. ७ कोटी पैकी १५% पुणे महापालिका GST(१८%) आणि ८५% टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेड या प्रमाणात करणेबाबत शिफारस केली आहे. सदर प्रकल्प ५ वर्षापैकी मूळ प्रस्तावानुसार पहिल्या ३ वर्ष यंत्रसामुग्रीची देखभाल दुरुस्तीचा कालावधीसोडून उर्वरित पुढील २ वर्षासाठी लागणारा अतिरिक्त खर्च र.रु.१४ कोटी १५% पुणे महापालिका+ GST(१८%) आणि ८५% टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेड या प्रमाणात करणेबाबत शिफारस केली आहे. सदरची बाब टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेड यांना मान्य आहे.
माहिती व तंत्रज्ञान विभागानी CEOP यांनी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे (CEOP) यांनी आह्वालात सुचविलेल्या बाबींची खात्याच्या मूळ प्रस्तावात बदल करून पुढील कार्यवाही करण्यास हरकत नाही असा अभिप्राय दिलेला आहे. त्यानुसार उपरोक्त दि.१५.०९.२०२३ च्या मूळ प्रस्तावात नमूद केलेल्या प्रकल्पाची किंमत एकूण र.रु.२२५,९८,८७,००६/- (अक्षरी – दोनशे पंचवीस कोटी आठ्याण्णव लाख सत्याऐंशी हजार सहा रुपये फक्त) ऐवजी बदलून र.रु.२४६,९८,९७,००६/- (अक्षरी – दोनशे सेहेचाळीस कोटी आठ्याण्णव लाख सत्याऐंशी हजार सहा रुपये फक्त) इतकी आहे. त्यानुसार सदर प्रकल्प निधीच्या ८५ टक्के निधी रक्कम रुपये २०९,९४,०३,९९५/- ( अक्षरी – दोनशे नऊ कोटी चौऱ्याण्णव लाख तीन हजार नऊशे पंच्याण्णव रुपये फक्त) टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेड यांच्याकडून उपलब्ध होणार होती. तर पुणे महानगरपालिकेकडून एकूण प्रकल्पाच्या खर्चापैकी १५ टक्के निधी
उभारणी खर्च रक्कम रुपये ३७,०४,८४,५५१/- (अक्षरी – सदोतीस कोटी चार लाख चौऱ्याऐंशी हजार पाचशे
एकावन्न रुपये फक्त) व त्यावरील वस्तू व सेवाकर रक्कम रुपये ६,६६,८७,२१९/- (अक्षरी – सहा कोटी सहासष्ट लाख सत्याऐंशी हजार दोनशे एकोणीस रुपये फक्त) असे एकूण रक्कम रुपये ४३,७१,७१,७७०/- (अक्षरी त्रेचाळीस कोटी एकाहत्तर लाख एकाहत्तर हजार सातशे सत्तर रुपये फक्त) निधीची आवश्यकता होती. सदर प्रकल्पासाठी लागणारा निधी भवन विभागाकडील सन २०२२-२३ च्या अंदाजपत्रकातील पान क्र १६६ वरील यादी क्र जे १० मधील बजेट कोड CE22A548/J10-88 वर पुणे शहरात CSR अंतर्गत Centre for
Invention, Innovation, Incubation and Training Centre (CIIIT) स्थापन करणे साठी तरतूद रक्कम रु ३९,८०,००,०००/- (अक्षरी – एकोणचाळीस कोटी ऐंशी लाख फक्त ) उपलब्ध होती. परंतु सदर प्रकल्पास अपरिहार्य कारणामुळे विलंब झाला आहे.
प्रस्ताव टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेड यांचे मार्फत दि. ०२.०९.२०२२ रोजी पुणे महानगरपालिकेस प्राप्त झाला होता. सदर प्रकल्पास विलंब झाल्यामुळे सदर प्रकल्पाच्या मूळ रक्कमेमध्ये काही प्रमाणात वाढ झाली आहे. दरम्यानच्या काळात पालक मंत्री,  अजित पवार, पुणे महोदय, यांचे समवेत झालेल्या बैठकीमध्ये
सदर प्रकल्प त्वरित राबविण्यासंदर्भात तोंडी सूचना प्राप्त झालेल्या आहेत. त्यानुसार दि. ३०.०१.२०२४ रोजी महापालिका आयुक्त यांचे समवेत टाटा टेक्नोलॉजीचे प्रतिनिधी व शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे (CEOP) यांचे प्रतिनीधी बैठकीस उपस्थित होते. तसेच शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे (CEOP) यांनी दि.२२.०२.२०२४ रोजी प्रस्ताव सादर केला आहे. सदर बैठकीत झालेल्या चर्चेनुसार सुधारित सामंजस्य करारात नमूद केलेल्या प्रकल्पाची किंमत र.रु. २७९,६७,४५,७८२/- इतकी आहे. त्यानुसार सदर प्रकल्प निधीच्या ८५टक्के र.रु.२३७,७२,३३,९१५/- इतकी रकम टाटा टेक्नोलॉजी यांचे मार्फत उपलब्ध होणार आहे. तसेच उर्वरित१५ टक्के रक्कम रुपये ४१,९५,११,८६७ + त्यावरील वस्तू व सेवाकर (१८ टक्के) रक्कम रुपये ७,५५,१२,१३६ /- असे एकूण रक्कम रुपये ४९,५०,२४,००३/- (अक्षरी – एकोण पन्नास कोटी पन्नास लाख चोवीस हजार तीन रुपये फक्त) निधीची आवश्यकता आहे.