PMC CHS Scheme | महापालिका कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी | सेवानिवृत्त सेवकांना तत्काळ दिला जाणार CHS योजनेचा लाभ | अतिरिक्त आयुक्त यांच्यासोबत झालेल्या बैठकीत निर्णय
PMC Retirement – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना (PMC Employees) सेवानिवृत्त झाल्यावर तत्काळ अंशदायी वैद्यकीय सहायता योजनेचा (CHS) लाभ दिला जात नाही. पेन्शन (PMC Pension) सुरू होईपर्यंत कर्मचाऱ्यांना योजनेच्या कार्ड साठी रखडत बसावे लागते. मात्र आता कर्मचाऱ्यांना या योजनेचा सेवानिवृत्त झाल्यावर देखील तत्काळ लाभ मिळणार आहे. त्यासाठी कर्मचाऱ्यांच्या शेवटच्या पगारातून १ टक्का रक्कम घेतली आहे. अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी पी (Prithviraj B P IAS) यांच्यासोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला आहे. सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना हा चांगला दिलासा मिळाला आहे. (Pune Municipal Corporation – PMC)
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचारी, आजी माजी नगरसेवकांसाठी अंशदायी वैद्यकीय सहायता योजना चालवली जाते. या आरोग्य योजनेचा सेवकांना चांगला फायदा होतो. मात्र सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना, ज्यांना अजून पेन्शन सुरू झाली नाही त्यांना या योजनेचे कार्ड दिले जात नाही. काही तांत्रिक कारणाने पेन्शन मिळण्यास विलंब होतो. आरोग्य विभागाच्या या नियमांमुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. (Pune PMC News)
दरम्यान सफाई कर्मचारी समन्वय समितीची बैठक अतिरिक्त आयुक्त (ई.) यांचे अध्यक्षते खाली नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये मनपाच्या सफाई कर्मचाऱ्याच्या अडीअडचणी, प्रश्न यांची चर्चा झाली. समितीच्या सदस्यांनी असा मुद्दा मांडला की, अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजनेचा लाभ सेवानिवृत्त सेवकांना दिला जात नसल्याने त्यानां खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यास अत्यंत हालअपेष्टा व खर्च सहन करावा लागत आहे. त्यामुळे सेवानिवृत्ती नंतर लगेच त्यांना अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजनेचा लाभ सुरु करावा. अशी मागणी बैठकीत करण्यात आली. यात मुख्य कामगार अधिकारी नितीन केंजळे यांनी पुढाकार घेतला होता.
त्यानुसार बैठकीत सेवानिवृत्त होणाऱ्या सेवकांना पेन्शन सुरु होण्यासाठी लागणारा कालावधी विचारात घेता सेवकांच्या शेवटच्या महिन्यातील वेतनाच्या मूळ वेतन, महागाई भत्ता यावर १% रक्कम आकारून त्यांना वैद्यकीय सहाय्य योजना लगेच लागू करावी असा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान बैठकीत हा निर्णय झाला असला तरी याबाबत आरोग्य विभागाकडून परिपत्रक जारी करण्यात आलेले नाही. त्यामुळे कामगार विभागाने आरोग्य विभागाला पत्र पाठवत याबाबतचे परिपत्रक जारी करण्याची सूचना केली आहे.
—-
कर्मचाऱ्यांचे पैसे महापालिकेकडे असून देखील पेन्शन सुरू झाली नसल्याने त्यांना CHS योजनेचा लाभ मिळत नाही. आमच्या ही गोष्ट निदर्शनास आल्यानंतर हा मुद्दा अतिरिक्त आयुक्तांच्या बैठकीत उपस्थित करण्यात आला होता. याला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. त्यानुसार याबाबत परिपत्रक काढण्यासाठी आम्ही आरोग्य विभागाला पत्र देखील पाठवले आहे.
– नितीन केंजळे, मुख्य कामगार अधिकारी.
COMMENTS