PMC CHS Scheme | 2005 नंतर नेमणूक झालेल्या कर्मचाऱ्यांना  सेवानिवृत्तीनंतर अंशदायी वैदयकीय योजनेचा (CHS) लाभ द्या | पीएमसी एप्लॉईज युनियन ची आयुक्तांकडे मागणी

HomeपुणेBreaking News

PMC CHS Scheme | 2005 नंतर नेमणूक झालेल्या कर्मचाऱ्यांना  सेवानिवृत्तीनंतर अंशदायी वैदयकीय योजनेचा (CHS) लाभ द्या | पीएमसी एप्लॉईज युनियन ची आयुक्तांकडे मागणी

Ganesh Kumar Mule Oct 16, 2023 1:32 PM

PMC CHS Card | CHS योजनेतील नवीन बदल जाणून घ्या! | काय आहे नवीन परिपत्रकात?
PMC CHS Scheme | महापालिका कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी | सेवानिवृत्त सेवकांना तत्काळ दिला जाणार CHS योजनेचा लाभ | अतिरिक्त आयुक्त यांच्यासोबत झालेल्या बैठकीत निर्णय
PMC CHS Health Scheme | अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजनेच्या औषध बिलांबाबत आरोग्य विभागाकडून नवीन नियमावली

PMC CHS Scheme | 2005 नंतर नेमणूक झालेल्या कर्मचाऱ्यांना  सेवानिवृत्तीनंतर अंशदायी वैदयकीय योजनेचा (CHS) लाभ द्या | पीएमसी एप्लॉईज युनियन ची आयुक्तांकडे मागणी

PMC CHS Scheme | पुणे महानगरपालिकेमध्ये (Pune Municipal Corporation) २००५ नंतर नेमणूक झालेल्या कार्यरत तसेच सेवकांना सेवानिवृत्तीनंतर CHS अंशदायी वैदयकीय सहाय्य योजनेचा लाभ दिला जात नाही. CHS अंशदायी वैदयकीय सहाय्य योजनेचा लाभ देणेबाबत अंशदायी वैदयकीय सहाय्य योजना समितीने ठेवलेला प्रस्ताव  मुख्य सभेची (PMC General Body)!मान्यता नसल्याचे कारणाने स्थगित ठेवण्यात आलेला आहे. तरी, महापालिका आयुक्तांनी (PMC Commissioner) सहानभुतीपुर्वक विचार करुन  मुख्य सभेची मान्यता देऊन २००५ नंतर नेमणूक झालेल्या सेवकांना सेवानिवृत्तीनंतर CHS अंशदायी वैदयकीय सहाय्य योजनेचा लाभ तात्काळ देऊन यापुढेही चालू ठेवावा. अशी मागणी पीएमसी एम्प्लॉईज युनियन (PMC Employees Union) च्या वतीने महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे. (PMC Pune CHS Scheme)
संघटनेच्या निवेदनानुसार सन २००५ नंतर नेमणूक झालेले सेवक पुणे महानगरपालिकेमध्ये संपुर्ण आयुष्य मनपाची व नागरिकांची सेवा करण्यामध्ये घालवतात. देशामध्ये आलेल्या अनेक महामारीमध्ये कोविड, स्वाईन फ्लू, प्लेग अन्य साथीच्या रोगांमध्ये पुणे महानगरपालिकेतील सेवकांना जीवाची पर्वा न करता, नागरिकांना चांगल्या सेवा सुविधा पुरविल्या आहेत. सेवकांच्या चांगल्या कामगिरीमुळे पुणे शहर देशामध्ये प्रथम १० नंबरच्या शहरांच्या यादीत गणले जाते. असे असताना पुणे महानगरपालिकेमध्ये २००५ नंतर नेमणूक झालेल्या कार्यरत तसेच सेवकांना सेवानिवृत्तीनंतर CHS अंशदायी वैदयकीय सहाय्य योजनेचा लाभ दिला जात नाही. एकीकडे नागरिकांना शहरी गरीब योजनेखाली वैदयकीय सेवा दिली जातात. (Pune Municipal Corporation)
सन २००५ नंतर नेमणूक झालेल्या सेवकांची जुनी पेन्शन योजना बंद केल्यामुळे कर्मचारी वर्गाचा आर्थिक कणा मोडलेला आहे. सेवानिवृत्तीनंतर अनेक आजारांना सामोरे जावे लागते. त्यासाठी CHS अंशदायी वैदयकीय सहाय्य योजना ही सेवानिवृत्तीनंतर सेवकांना संजीवनी आहे. परंतु, वय झाल्यानंतर अंशदायी वैदयकीय सहाय्य योजनेची अत्यंत गरज असताना आपले कालखंडात ती सेवा बंद करण्यात आल्याचे समजते. सन २००५ नंतर नियुक्त सेवकांना CHS अंशदायी वैदयकीय सहाय्य योजनेचा लाभ देणेबाबत अंशदायी वैदयकीय सहाय्य योजना समितीने ठेवलेला प्रस्ताव मुख्य सभेची मान्यता नसल्याचे कारणाने स्थगित ठेवण्यात आलेला आहे. तरी,  सर्व गोष्टींचा मा. आयुक्त यांनी सहानभुतीपुर्वक विचार करुन मुख्य सभेची मान्यता देऊन २००५ नंतर नेमणूक झालेल्या सेवकांना सेवानिवृत्तीनंतर CHS अंशदायी वैदयकीय सहाय्य योजनेचा लाभ तात्काळ देऊन यापुढेही चालू ठेवावा. अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. (PMC Pune Employees)
——-