PMC Chief Labour Officer | ‘मुख्य कामगार अधिकारी’ या पदावर काम करण्यास संधी देण्याची रमेश शेलार यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी!
शेलार यांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे कि, मुख्य कामगार अधिकारी हे पदनाम पुणे महानगरपालिका सेवा प्रवेश नियमावली ६ ऑगस्ट २०१४ रोजी मान्य झाले. त्या पदी पालिकेतील सल्लागार कामगार या पदावरती सरळसेवेने भरती
झालेले सेवक शिवाजी दौंडकर हे कार्यरत होते. ते वयोपरत्वे ३१ मे २०२३ रोजी सेवानिवृत्त झाले. नंतर ०६ जून २०२३ पदोन्नतीने अरुण खिलारी यांची मुख्य कामगार अधिकारी निवड झाली. ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी म्हणजे उद्या खिलारी सुद्धा सेवानिवृत्त होत आहेत. सामान्य प्रशासन विभागाकडून पुन्हा पदोन्नतीने हे पद भरले जात आहे. वास्तविक सेवा प्रवेश नियमावली २०१४ मध्ये पदोन्नतीने अशी विभागणी दाखविली आहे. शेलार यांनी म्हटले आहे कि पदोन्नती आणि प्रतिनियुक्ती अशा पद्धतीने हे पद भरले जाऊ शकते. प्रति नियुक्तीसाठी शासन सेवेतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेतील समकक्ष पद मागील 5 वर्षांपासून धारण करणारा अधिकारी यासाठी पात्र ठरू शकतो. त्याचाच आधार घेऊन शेलार यांनी ही मागणी केली आहे. शेलार यांनी म्हटले आहे कि पदोन्नती देताना प्रशासनाने माझ्या नावाचा विचार करायला हवा होता. माझे हक्क हिरावले जाऊ नयेत, असेही शेलार यांनी म्हटले आहे. (PMC Pune)
दरम्यान पदोन्नती समितीने मुख्य कामगार पदासाठी कामगार अधिकारी नितीन केंजळे यांची शिफारस केली आहे. त्यानुसार प्रशासनाने याबाबतचा प्रस्ताव विधी समिती समोर ठेवला आहे. मात्र याला अजून मान्यता दिलेली नाही. अशातच आता या पदासाठी रमेश शेलार यांनी दावा केला आहे. त्यावर आता प्रशासनाची भूमिका महत्वाची ठरणार आहे. दरम्यान शेलार यांनी नुकताच महापालिका अतिरिक्त आयुक्त पदावर देखील दावा केला होता. तशी मागणी देखील प्रशासनाकडे केली होती. (Ramesh Shelar News)
——-