PMC Chief Finance and Account Officer | उल्का कळसकर यांच्याकडील अतिरिक्त पदभार कमी केला!
| महापालिका आयुक्तांकडून आदेश जारी
PMC Chief Finance and Account Officer | पुणे महापालिकेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी पदी (PMC Chief Finance and Account Officer) राज्य सरकारकडून जितेंद्र कोळंबे (Jitendra Kolambe) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिकेत बऱ्याच दिवसापासून रिक्त असलेले हे पद भरण्यात आले आहे. दरम्यान यामुळे मात्र मुख्य लेखा व वित्त अधिकारी उल्का कळसकर यांच्याकडील पदभार कमी केला आहे. कळसकर यांच्याकडे फक्त खर्च ची जबाबदारी असेल तर कोळंबे यांच्याकडे महसूल ची जबाबदारी असणार आहे. तसेच कळसकर यांनी अंदाजपत्रकीय कामकाज (PMC Budget) करायचे, असे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar) यांनी जारी केले आहेत. (PMC Chief Finance and Account Office)
कोळंबे हे महापालिका सेवेत प्रतिनियुक्तीने आले आहेत. याआधी कोळंबे महाराष्ट्र सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ पुणे इथे वित्त व लेखा अधिकारी म्हणून कार्यरत होते. वित्त व लेखा संचालक संवर्गात त्यांना पदोन्नती देण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांना सुधारित पदस्थापना देण्यात आली आहे. (Pune Municipal Corporation)
पुणे महापालिकेत मुख्य वित्त व लेखा अधिकारी यांची दोन पदे आहेत. यामध्ये महापालिका अर्थसंकल्पातील जमा बाजू म्हणजे महसूल साठी एक अधिकारी आणि खर्चाच्या बाजू साठी दुसरा अधिकारी काम करणे अपेक्षित आहे. सद्यस्थितीत या दोन्ही पदाचे कामकाज मुख्य लेखा व वित्त अधिकारी उल्का कळसकर पाहत आहेत. काही वर्षांपूर्वी यातील महसूल बाजूची जबाबदारी महापालिकेत प्रतिनियुक्तीने आलेले तत्कालीन उपायुक्त तुषार दौंडकर यांच्याकडे दिली होती. मात्र त्यांची बदली झाल्यानंतर हे पद रिक्तच होते. अतिरिक्त पदभार कळसकर पाहत होत्या. दरम्यान आता सरकारने दुसरा अधिकारी या पदासाठी दिला आहे. त्यानुसार महापालिका आयुक्तांनी आदेश जारी केले आहेत. खर्चाची बाजू राज्य सरकारचा अधिकारी पाहणार, कि महापालिकेचा याबाबत उत्सुकता लागून राहिली होती. मात्र उल्का कळसकर यांच्याकडील पदभार कमी केला आहे. कळसकर यांच्याकडे फक्त खर्च ची जबाबदारी असेल तर कोळंबे यांच्याकडे महसूल ची जबाबदारी असणार आहे. तसेच कळसकर यांनी अंदाजपत्रकीय कामकाज करायचे, असे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी जारी केले आहेत. (PMC Pune)
——
News Title | PMC Chief Finance and Accounts Officer | Ulka Kalaskar’s additional charge reduced! Order issued by Municipal Commissioner