PMC Chief Auditor on Retirement | कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीपूर्वी ६ महिने अगोदर निवृत्तिवेतन विषयक कागदपत्रांचे कामकाज पूर्ण करा | मुख्य लेखापरीक्षक विठ्ठल चव्हाण यांचे आदेश 

Homeadministrative

PMC Chief Auditor on Retirement | कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीपूर्वी ६ महिने अगोदर निवृत्तिवेतन विषयक कागदपत्रांचे कामकाज पूर्ण करा | मुख्य लेखापरीक्षक विठ्ठल चव्हाण यांचे आदेश 

Ganesh Kumar Mule Mar 13, 2026 7:59 PM

PMC Chief Auditor Office | लेखापरीक्षण विभागाकडील ११ कर्मचाऱ्यांना कनिष्ठ लेखापरीक्षक पदावर दिली जाणार पदोन्नती | शिफारस केलेल्या कर्मचाऱ्यांची स्थायी समितीने पडताळणी न केल्याने होणार विवाद!
PMC Sky Sign Department | आकाशचिन्ह विभागाने होर्डिंग धारकांकडून 404 कोटीची वसुली केलीच नाही
PMC Chief Auditor | मुख्य लेखा परीक्षक पदाचा अतिरिक्त पदभार जितेंद्र कोळंबे यांच्याकडे! | महापालिका आयुक्तांचे आदेश 

PMC Chief Auditor on Retirement | कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीपूर्वी ६ महिने अगोदर निवृत्तिवेतन विषयक कागदपत्रांचे कामकाज पूर्ण करा | मुख्य लेखापरीक्षक विठ्ठल चव्हाण यांचे आदेश

 

PMC Retirement – (The Karbhari News Service) – नियमांचे पालन न केल्यामुळे सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी तसेच कुटुंब निवृत्तिवेतनधारक यांना निवृत्ती विषयक लाभ वेळेवर प्रदान केले जात नाहीत. त्यामुळे  निवृत्तिवेतन प्रकरणे वेळेवर होण्यासाठी  निवृत्तीपूर्वी २ वर्षे अगोदर निवृत्तिवेतन विषयक कागदपत्रे तयार करण्यास सुरुवात करावी.  विविध टप्प्यानुसार निवृत्तिवेतन विषयक कागदपत्रे तयार करून कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती  पूर्वी ६ महिने अगोदर निवृत्तिवेतन विषयक कागदपत्रांचे कामकाज पूर्ण करावे. असे आदेश मुख्य लेखापरीक्षक विठ्ठल चव्हाण यांनी सर्व विभागांना दिले आहेत. (PMC Chief Auditor Vitthal Chavan)

 

महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन)  नियमांचे पालन न केल्यामुळे सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी तसेच कुटुंब निवृत्तिवेतनधारक यांना निवृत्ती विषयक लाभ वेळेवर प्रदान केले जात नाहीत. परिणामी, याबाबत अनेक तक्रारी  महापालिका आयुक्त, अतिरिक्त महापालिका आयुक्त तसेच महापालिका सभासद यांचेकडे प्राप्त होत आहेत. याबाबत विभागांना सेवानिवृत्तीपूर्वीच निवृत्तीवेतन प्रकरणे सादर करण्याच्या सूचना देऊनही याबाबत कारवाई होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे वादाचे प्रसंग तसेच न्यायालयीन प्रकरणे देखील उद्भवतात. यामुळे महापालिका मनुष्यबळ तसेच निधीचा अपव्यय होतो.

त्यामुळे  निवृत्तिवेतन प्रकरणे वेळेवर होण्यासाठी कर्मचाऱ्याच्या  निवृत्तीपूर्वी २ वर्षे अगोदर निवृत्तिवेतन विषयक कागदपत्रे तयार करणेस सुरुवात करावी. नियम १२१ मधील विविध टप्प्यानुसार निवृत्तिवेतन विषयक कागदपत्रे तयार करून नियम १२२ नुसार कर्मचार्याच्या निवृत्तीपूर्वी ६ महिने अगोदर निवृत्तिवेतन विषयक कागदपत्रांचे कामकाज पूर्ण करावे. तदनंतर संबंधित विभागप्रमुख, कार्यालय प्रमुख यांनी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचार्याचा निवृत्तिवेतनाचा परिपूर्ण प्रस्ताव लेखा व वित्त विभाग मार्फत लेखापरीक्षण विभागाकडे सादर करावा. निवृत्तिवेतन प्रकरणांमध्ये वारंवार होणाऱ्या चूका टाळाव्यात. तसेच निवृत्तिवेतन प्रकरणांचे हाताळणीसाठी विभागप्रमुख / कार्यालय प्रमुख स्तरावर नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करावी. निवृत्तिवेतन प्रकरणांचा आढावा संबंधित विभागप्रमुख / कार्यालय प्रमुख यांनी दरमहा घ्यावा. असे मुख्य लेखापरीक्षक यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.

निवृत्तिवेतन प्रकरण पूर्ण न झाल्याने सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला निवृत्तीवेतन मिळत नाही, ही बाब अत्यंत खेदजनक आहे. तरी सर्व विभागप्रमुख, कार्यालय प्रमुख यांनी अशा प्रकरणांचा आढावा घेऊन ही प्रकरणे पूर्ण करून तात्काळ लेखा व वित्त विभागामार्फत लेखापरीक्षण विभागाकडे सादर करावीत. यापुढे अशी विलंबाने निवृत्तिवेतन प्रकरणे सादर झाल्यास अशा विभागप्रमुखांची नावे अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज.) व महापालिका आयुक्त यांच्या निदर्शनास आणून देण्यात येतील. असा इशारा देखील मुख्य लेखापरीक्षक यांनी दिला आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: