PMC Call Center | Command and Control Center | कमांड सेंटर चा निधी कॉल सेंटर च्या कामासाठी!

HomeपुणेBreaking News

PMC Call Center | Command and Control Center | कमांड सेंटर चा निधी कॉल सेंटर च्या कामासाठी!

कारभारी वृत्तसेवा Dec 28, 2023 6:30 AM

PMC Pune Services | नागरी सुविधा केंद्रावरील कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी आता क्षेत्रीय कार्यालयाचा समन्वय अधिकारी
PMC IT Department | पुणे महापालिकेच्या प्रत्येक विभागात आयटी विषयक कामासाठी आता दोन नोडल ऑफिसर!
PMC Care | Pune Municipal Corporation | पीएमसी केअर प्लॅटफॉर्म नव्या स्वरुपात | नागरिकांना एका क्लिकवर मिळणार सर्व सुविधा!

PMC Call Center | Command and Control Center | कमांड सेंटर चा निधी कॉल सेंटर च्या कामासाठी! 

 

| स्थायी समिती समोर वर्गीकरणाचा प्रस्ताव 

 
 
PMC Call Center | Command and Control Center | पुणे | महापालिकेच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाकडून (PMC IT Department) कॉल सेंटर (PMC Call Center) उभारण्यात येणार आहे. यासाठी 56 लाख 15 हजाराचा खर्च येणार आहे. मात्र अर्थसंकल्पात यासाठी अवघी 24 लाखाची तरतूद करण्यात आली आहे. उर्वरित 32 लाख 15 हजाराची रक्कम कमांड सेंटर (PMC Command and Control Center) च्या कामातून वर्ग करून घेतली जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाकडून स्थायी समिती (PMC Standing Committee) समोर ठेवण्यात आला आहे. (PMC Call Center | Command and Control Center)

शहरातील सर्व संस्थांना एकत्र करून लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी तसेच आपत्तीच्या वेळी लोकांना मदत करण्यासाठी ‘कमांड अँड कंट्रोल सेंटर’ तयार करण्यात आले आहे.  सध्या त्यावर स्मार्ट सिटी कार्यालयाचे नियंत्रण आहे.  पण तिथून आता नीट काम होताना दिसत नाही.  त्यामुळे महापालिका आयुक्तांनी तो महापालिका भवनात आणण्याचा निर्णय घेतला आहे.  याद्वारे वाहतूक नियोजन, सीसीटीव्ही, आपत्ती व्यवस्थापन, वाहन ट्रॅकिंग यंत्रणा आदींचे व्यवस्थापन केले जाणार आहे.  त्यासाठी सुमारे 40 कोटी रुपये खर्च येणार आहे.  त्याची तरतूद महापालिका आयुक्तांनी अर्थसंकल्पात केली आहे. (PMC Pune Command and Control Center)

दरम्यान स्थायी समितीच्या प्रस्तावानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागातील सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी उपलब्ध बजेट तरतुदी मध्ये विविध निविदेच्या कामकाजाच्या खर्चासाठी तरतूद उपलब्ध नसल्याने तथा कमी असल्याने वर्गीकरणाद्वारे तरतूद उपलब्ध करून मिळणेस गरजेचे आहे. पुणे शहरातील नागरिकांना नागरी सुविधा विषयक सेवा अधिक कार्यक्षमपणे उपलब्ध होण्यासाठी व नागरी सुविधांची माहिती कुठेही, केव्हाही व कधीही सहजपणे उपलब्ध व्हावी यासाठी सर्व सामान्य नागरिकांना टोल फ्री दूरध्वनी नंबरच्या (1800-1030-222) माध्यमातून कॉल सेंटरद्वारे माहिती घेणेकरिता किंवा तक्रार नोंदविण्याकरिता कॉल सेंटरची निविदा प्रक्रिया करण्यात आली होती. विषयांकित कामासाठी माहिती वतंत्रज्ञान विभागामार्फत निविदा प्रसिद्ध करण्यात आली असता Calling 2407 BPO Services Pvt Ltd यांना L1 दराने कामकाज देण्यात आले आहे. हे कामकाज करणेकरिता सन २०२३-२४ साठी RE11N103/R9-11 या अर्थशिर्षकावरील उपलब्ध असलेली तरतूद अपुरी पडत आहे. कामकाजाचे बिल अदा करण्यासाठी आवश्यक रक्कम वर्गीकरणाद्वारे अधिकची तरतूद उपलब्ध करून मिळणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने महापालिका आयुक्तांनी सेन्ट्रलाईज कमांड सेंटर उभारणेसाठी असलेल्या बजेट तरतूद CE30A101/I1-1 मधून बत्तीस लाख पंधरा हजार रक्कमेची तरतूद वर्गीकरणाद्वारे उपलब्ध करून देण्यास मान्यता दिलेली आहे. त्यानुसार स्थायी समिती समोर प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.