PMC Building Devlopment Department | मुंढवा, घोरपडी परिसरातील हॉटेल्स वर पुणे महापालिकेकडून गुन्हे दाखल
PMC Action against Pub and Bar – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम विकास विभाग कडून मुंढवा, कोरेगावपार्क, एरंडवणा, सदाशिव पेठ या भागामध्ये हॉटेल, रेस्टॉरंवर कारवाई करण्यात आली. मुंढवा आणि घोरपडी परिसरातील हॉटेल्स वर महापालिकेकडून MRTP 52 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. अशी माहिती बांधकाम विकास विभागाकडून देण्यात आली. (Pune Municipal Corporation (PMC)
पुणे हिट अँड रन केस चा मुद्दा गाजल्या नंतर पुणे महापालिकेकडून अनधिकृतपणे चालवल्या जात असलेल्या हॉटेल्स आणि बार वर कारवाई करण्यात येत आहे. शुक्रवारी शहरात 14 ठिकाणी 19 हॉटेल्स वर कारवाई करण्यात आली. कारवाई एकूण 2 गटात विभागणी करण्यात आली होती. यात 15925 चौ. फुट अवैध बांधकाम हटवण्यात आले. (Pune Hit and Run Case)
आज रोजी घेण्यात आलेल्या रेस्टॉरट हॉटेलस यांचे साईड मार्जिन मधील अनाधिकृत केलेल्या शेडस या पूर्वी कारवाई करून काढून घेण्यात आलेल्या होत्या. शेडस ह्या संबंधितांनी परत उभारणी केली असल्यामुळे आज शेडस परत काढून घेण्यात आलेल्या आहेत. या व्यतिरिक्त आज मुढवा येथील वॉटर्स, ओरीला, अनवाईट, हिंगोणे, कार्निवल, बॉटल फॉरेस्ट, मासा, व चिलीज तसेच घोरपडी येथील Q बार, पेटाहाऊस, स्पाईस फॅक्टरी व आकारी या हॉटेलस, रेस्टोरट वर गुन्हा दाखल करण्यात आला. असे बांधकाम विकास विभागाकडून सांगण्यात आले.