PMC Building Devlopment Department |पाषाण परिसरात विनापरवाना शो रूम, हॉटेल्सवर महापालिकेची कारवाई   | 90 हजार चौरस फूट बांधकाम हटवले 

HomeBreaking Newsपुणे

PMC Building Devlopment Department |पाषाण परिसरात विनापरवाना शो रूम, हॉटेल्सवर महापालिकेची कारवाई  | 90 हजार चौरस फूट बांधकाम हटवले 

गणेश मुळे Jul 12, 2024 2:40 PM

PMC Action Against Hotels | मोहम्मदवाडी, कर्वेनगर परिसरात महापालिका बांधकाम विभागाची हॉटेल वर कारवाई 
DP Road | PMC Encroachment action | डीपी रस्त्यावर महापालिकेची अनधिकृत बांधकामावर कारवाई
Action by PMC on 11 unauthorized buildings near Sinhagad College in Ambegaon

PMC Building Devlopment Department |पाषाण परिसरात विनापरवाना शो रूम, हॉटेल्सवर महापालिकेची कारवाई

| 90 हजार चौरस फूट बांधकाम हटवले

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पाषाण मुंबई पुणे महामार्ग  वरील पाषाण परिसरात विनापरवाना शो रूम, हॉटेल्सवर महापालिका बांधकाम विकास विभागाचे वतीने आज पुन्हा जोरदार कारवाई करण्यात आली. यापुर्वी रस्त्याच्या पश्चिम बाजूस कारवाई करण्यात आली होती. आज पूर्व बाजूकडील 11 शो रूम, हॉटेल्स वर करून सुमारे 90 हजार चौरस फूट बांधकाम पाडण्यात आले. अशी माहिती बांधकाम विकास विभागाच्या वतीने देण्यात आली. (Pune Municipal Corporation (PMC)

बांधकाम हे HEMRL या संरक्षण विभागाच्या प्रतिबंधित क्षेत्रात येत आहे. या बाबत HEMRL कडून तक्रारी करण्यात आल्या होत्या. तसेच सदर क्षेत्र PSP झोन मध्ये येत आहे. या मधील 7 मिळकतधारकांनी मे. न्यायालयातून स्थगिती आदेश प्राप्त केल्या मुळे यांचेवर कारवाई करण्यात आली नाही.
यावेळी jwa कटर मशीन, दोन jcb, गॅस कटर, ब्रेकर, 15 बिगारी व पोलीस कर्मचारी यांनी सहभाग घेतला.

चतुःशृंगी पोलीस स्टेशन चे कर्मचारी सुद्धा उपस्थित होते.
खबरदारीचा उपाय म्हणून अग्नीशमन विभागाची गाडी तयार ठेवण्यात आली होती.