PMC Building Devlopment Department | बाणेर बालेवाडी भागातील हॉटेल, पब वर महापालिकेकडून कारवाई 

HomeपुणेBreaking News

PMC Building Devlopment Department | बाणेर बालेवाडी भागातील हॉटेल, पब वर महापालिकेकडून कारवाई 

गणेश मुळे May 29, 2024 2:58 PM

Illegal Hoardings | 31 मे पर्यंत शहर अनधिकृत होर्डिंग मुक्त करण्याचा महापालिकेचा मानस | उपायुक्त माधव जगताप यांची माहिती
Kasba By election | Mahayuti | कसब्यात महायुतीचे शक्ती प्रदर्शन
Chandrasekhar Bawankule | राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लवकरच राजकीय स्फोट झालेला दिसेल | चंद्रशेखर बावनकुळे असे का म्हणाले?

PMC Building Devlopment Department | बाणेर बालेवाडी भागातील हॉटेल, पब वर महापालिकेकडून कारवाई

 

PMC Pune Municipal Corporation – (The Karbhari News Servcie) – बालेवाडी व बाणेर भाग येथील बालेवाडी हाय स्ट्रीट परिसरातील हॉटेल, पब, चौपाटी, चे पत्राशेड व अनधिकृत बांधकाम यावर आज बांधकाम विकास विभाग झोन 3 यांचेमार्फत पोलीस स्टाफच्या मदतीने कारवाई करण्यात आली. (Baner Balewadi pub hotels)

बालेवाडी हाय स्ट्रीट परिसरातील फीस्ट इंडिया,दार्जिलिंग कॅफे, ब्र्यू कॅफे, ग्लोबल चस्का,डॉक यार्ड, पंजाबी कॉर्नर,जगदंबा , सर्किट हाऊस,मदारी, इत्यादी हॉटेल्स. व हिप्पी अँड हार्ट,नवाब आशिया, लिट, अपाची हायस्ट्रीट, थ्री मोस्कुटोज इत्यादी पब वर कारवाई करण्यात आली. (Pune PMC News)

कारवाई मधे सुमारे 52848 चौ.फूट क्षेत्र निष्कासित करण्यात आले आहे.

ही कारवाई पुणे महानगरपालिकेचे अधिक्षक अभियंता श्रीधर येवलेकर, बांधकाम विभाग झोन क्र.३ चे कार्यकारी अभियंता, जयवंत पवार यांचे मार्गदर्शनाखाली उप अभियंता – प्रकाश पवार, कनिष्ठ अभियंता – विश्वनाथ बोटे, संदीप चाबुकस्वार ,अजित सणस, केतन जाधव व स्टाफ, 4 पोलिस 6 सुरक्षा रक्षक यांच्या पथकाने दोन जेसीबी, दोन गॅस कटर, दोन ब्रेकर दहा अतिक्रमण कर्मचारी यांचे सहाय्याने कारवाई केली.