Loksabha Election 2024 Results | मतमोजणी केंद्रावर विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांची नियुक्ती

HomeपुणेBreaking News

Loksabha Election 2024 Results | मतमोजणी केंद्रावर विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांची नियुक्ती

गणेश मुळे May 29, 2024 3:24 PM

Pune Loksabha Election 2024 | निवडणूक निरीक्षकांकडून पुणे जिल्ह्यातील निवडणूक तयारीचा आढावा
Pune Election 2024| निवडणूक पारदर्शक होण्यासाठी सुक्ष्म नियोजनावर भर | जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
B. G. Kolse Patil | मोदींनी ३०० लाख कोटींच्या घोटाळ्याचा हिशोब द्यावा | माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांचे मत

Loksabha Election 2024 Results | मतमोजणी केंद्रावर विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांची नियुक्ती

 

Pune Loksabha Election Results 2024 – (The Karbhari News Service)  लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी ४ जून रोजी होणार असून ही प्रक्रिया शांततेत व निःपक्षपाती वातावरणात पार पाडली जावी व कोठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रत्येक मतमोजणी केंद्रावर विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांची नेमणूक करण्यात आल्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. (Pune Loksabha Election 2024)

फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम २१ अन्वये या विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून त्यांना संहिता कलम १२९. १३३, १४३ व १४४ खाली अधिकार बहाल करण्यात आले आहेत.

मावळ लोकसभा मतदार संघाची मजमोजणी बालेवाडी स्टेडीयम येथे होणार असून त्या ठिकाणी पिंपरी चिंचवड अप्पर तहसील कार्यालयातील निवासी नायब तहसीलदार प्रवीण ढमाले (९८५०५०४५८८) यांची नेमणूक विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून करण्यात आली आहे. पुणे आणि बारामती लोकसभा मतदार संघाची मतमोजणी एफसीआय गोडावून कोरेगाव पार्क, पुणे येथे होणार असून त्याठिकाणी पुणे येथील निवासी नायब तहसीलदार शंकर ठुबे (९८२२६५२७३७) यांची नेमणूक करण्यात आली आहे.

शिरुर लोकसभा मतदार संघाची मतमोजणी होणाऱ्या महाराष्ट्र औद्यागिक वखार महामंडळाचे गोडावून नं. २, ब्लॉक पी-३९, एमआयडीसी एरिया रांजणगाव, कारेगांव, ता. शिरुर येथे शिरूर तहसिल कार्यालयातील नायब तहसीलदार स्नेहा गिरी गोसावी (९४२००१३९४६) यांची नियुक्ती विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून करण्यात आल्याचे आदेश अपर जिल्हा दंडाधिकारी तथा नोडल अधिकारी कायदा सुव्यवस्था ज्योती कदम यांनी जारी केले आहेत.