PMC Birth Death Certificate | पुणेकरांना आता ईमेल वर देखील मिळू शकेल जन्म-मृत्यू प्रमाणपत्र! | महापालिकेने उपलब्ध करून दिली सुविधा!

Homeadministrative

PMC Birth Death Certificate | पुणेकरांना आता ईमेल वर देखील मिळू शकेल जन्म-मृत्यू प्रमाणपत्र! | महापालिकेने उपलब्ध करून दिली सुविधा!

Ganesh Kumar Mule Dec 20, 2024 8:23 PM

PMC Health Service | माजी नगरसेविकेची आक्रमकता आणि सहायक आरोग्य अधिकाऱ्याच्या प्रयत्नाने अखेर वरिष्ठ नागरिकाला मिळाला न्याय!
Medical Insurance For PMC | अंशदायी वैद्यकीय योजना जाणार मेडिक्लेम कंपनीच्या ताब्यात! | महापालिका नेमणार ब्रोकर 
Urban Poor Medical Scheme | शहरी गरीब वैद्यकीय योजना | नागरिकांचे हेलपाटे वाचवण्यासाठी ऑनलाईन सोबत ऑफलाईनची देखील असणार सुविधा!

PMC Birth Death Certificate | पुणेकरांना आता ईमेल वर देखील मिळू शकेल जन्म-मृत्यू प्रमाणपत्र! | महापालिकेने उपलब्ध करून दिली सुविधा!

 

PMC Helath Department – (The Karbhari News Service) – पुणेकर नागरिकांना आता जन्म मृत्यू प्रमाणपत्र मिळणे सोपे झाले आहे. शिवाय आता या प्रमाणपत्रासाठी फार काळ वाट देखील पाहण्याची गरज नाही. त्यातच भर म्हणजे आता नागरिकांनी संबंधित हॉस्पिटलला ईमेल आयडी दिला तर नागरिकांना हे दोन्ही प्रमाणपत्र ईमेल वर देखील उपलब्ध होऊ शकणार आहेत. महापालिकेच्या जन्म मृत्यू कार्यालयाने (PMC Birth Death Registration office) ही सुविधा उपलब्ध करून दिली असल्याची माहिती महापालिका सहायक आरोग्य अधिकारी डॉ मनीषा नाईक (Dr Manisha Naik PMC) यांनी दिली. (Pune Municipal Corporation – PMC)

खासगी रुग्णालयांना जन्म-मृत्यूची नोंद थेट केंद्र शासनाने विकसित केलेल्या केंद्रीय नागरी प्रणालीमध्ये (सीआरएस) करता येत आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने त्यांना तसा अधिकार देण्याचा निर्णय घेतला होता. नोंदी मंजूर करण्याची अंतिम जबाबदारी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे आहे.  ‘सीआरएस’ प्रणालीत आलेल्या तांत्रिक अडचणींमुळे शहरात जन्म-मृत्यू दाखले नागरिकांना वेळेत मिळाले नाहीत. केंद्र शासनाने मार्च २०१९ पासून ‘सीआरएस’ प्रणाली लागू केली. त्याआधी ही नोंद महापालिकेच्या जन्म-मृत्यू विभागाकडे होत असे. आता महापालिकेच्या आरोग्य विभागाकडील जन्म-मृत्यू नोंदणीचे कामकाज १५ क्षेत्रीय कार्यालय स्तरावर उपनिबंधक तथा क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत करण्यात येते. दरम्यान यावर्षी जूनपासून सुधारित ‘सीआरएस’ प्रणाली लागू केली आहे. त्यानुसार जन्म-मृत्यू घटनांची नोंद संबंधित रुग्णालये, प्रसूतिगृहे (खासगी, सरकारी) यांना देण्यात आलेल्या संस्थात्मक लॉगिन वरून करण्यात येत आहे. त्यासाठी लॉगिन आयडी आणि पासवर्ड देण्यात आले आहेत.

याबाबत डॉ मनीषा नाईक यांनी सांगितले कि, जन्म मृत्यूची नोंद आता हॉस्पिटल स्वतः अपलोड करत असल्याने प्रमाणपत्र मिळण्याचे काम सोपे झाले आहे. यामुळे नागरिकांना खूप कमी वेळात प्रमाणपत्र मिळत आहे. प्रमाणपत्र ऑनलाइन उपलब्ध होत आहे. शिवाय ज्यांना हार्ड कॉपी हवी असते त्यांना संबंधित क्षेत्रीय कार्यालयात जावे लागते. डॉ नाईक यांनी पुढे सांगितले की, नागरिकांनी आपल्या कागदपत्रांच्या सोबत रुग्णालयात आपला ईमेल आयडी उपलब्ध करून दिला तर प्रमाणपत्र त्यांना घरबसल्या त्यांच्या इमेल वर प्राप्त होईल.

क्षेत्रीय वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून मागितला अहवाल 

दरम्यान क्षेत्रिय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील सर्व मनपा/ शासकीय व खाजगी रुग्णालयाकडील सर्व Data Entry Operator यांना Institutional Login व Password उपलब्ध करून देणे व सर्व Data Entry Operator यांचे  क्षेत्रिय कार्यालय स्तरावर सूचना व प्रशिक्षण घेऊन जन्म-मृत्यू बाबतचे कामकाज
त्वरित सुरु करणे व याबाबतचा अहवाल  सादर करणेबाबत  सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार क्षेत्रिय कार्यालयाकडील अहवाल २ दिवसात मुख्य कार्यालयास कळविण्यात यावा. असे आदेश डॉ नाईक यांनी सर्व क्षेत्रीय वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले आहेत.
——

नागरिकांना पूर्वी जन्म मृत्यू प्रमाणपत्र मिळवताना खूप वेळ घालवावा लागत होता. मात्र आता ही प्रक्रिया आम्ही सोपी केली आहे. नागरिक संबंधित हॉस्पिटलमध्ये आपले कागदपत्र देऊ शकतात. तसेच खाजगी रुग्णालयाना कागदपत्र प्रणालीवर अपलोड करण्याचे अधिकार दिले असल्याने आता प्रमाणपत्र साठी वेळ लागत नाही. शिवाय नागरिक जर आपला ईमेल आयडी हॉस्पिटल कडे देतील तर त्यांना प्रमाणपत्र हे ईमेल वर प्राप्त होऊ शकेल.

डॉ मनीषा नाईक, सहायक आरोग्य अधिकारी.