PMC Biometric Attendance | महापालिका भवनात १० बायोमेट्रिक मशीन | इंटरनेट कनेक्शन नसल्याने काही मशीन बंद अवस्थेत!
| इंटरनेट कनेक्शन देण्याची संगणक विभागाची जबाबदारी
Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महापालिका कर्मचारी आणि अधिकारी यांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्यात आली आहे. त्यानुसार १ डिसेंबर पासून याची सुरुवात झाली आहे. महापालिका भवनात १० मशीन्स बसवण्यात आल्या आहेत. मात्र यातील काही मशीन्स इंटरनेट कनेक्शन नसल्याने बंद आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांना ठरावीक मशीन्स वरच अवलंबून रहावे लागत आहे. याबाबत प्रशासनाकडून सांगण्यात आले कि इंटरनेट कनेक्शन देण्याबाबत संगणक विभागाला सूचना केल्या आहेत. त्यानुसार पुढील आठवड्या पासून सर्व मशीन्स सुरळीत राहतील. (Pune Municipal Corporation – PMC)
| बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक
पुणे महानगरपालिकेतील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी “Aadhaar Based Facial Biometric Attendance” रजिस्ट्रेशन पूर्ण करून १ डिसेंबर पासून मुख्य इमारतीमध्ये तसेच १ जानेवारी पासून सर्व परिमंडळ कार्यालये, क्षेत्रीय कार्यालये व इतर सर्व खात्यांमध्ये बायोमेट्रिक पद्धतीनेच दैनंदिन हजेरीची नोंद करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त यांनी दिले आहेत. यामध्ये दिरंगाई झाल्याचे निदर्शनास आल्यास तसेच बायोमेट्रिक हजेरी अभावी वेतन अदा करण्यामध्ये अडचणी उद्भवल्यास संबंधित खातेप्रमुखास व सेवकास व्यक्तीशः जबाबदार धरून त्यांचेविरुद्ध आवश्यक ती पुढील प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल. असा इशारा अतिरिक्त आयुक्त यांनी दिला होता. त्यानुसार मशीन्स बसवण्यात आल्या आहेत.
| एकूण ६० मशीन्स बसवण्यात येणार
महापालिका भवन, परिमंडळ, क्षेत्रीय कार्यालये, दवाखाने, पंपिंग स्टेन्शन अशा विविध ठिकाणी ६० बायोमेट्रिक मशीन्स बसवण्यात येणार आहेत. त्यातील १० मशीन्स महापालिका भवनात बसवण्यात आल्या आहेत. तर मनपा भवनातील एकूण ८ हजार कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. क्षेत्रीय कार्यालय आणि परिमंडळ यातील कर्मचारी यांची देखील नोंदणी करून घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र कर्मचारी याला प्रतिसाद देत नाहीत. असे विद्युत विभागाकडून सांगण्यात आले आहे.

COMMENTS